बडनेरा येथे पारधी समुदायात धुमश्चक्री

By admin | Published: February 15, 2017 12:03 AM2017-02-15T00:03:29+5:302017-02-15T00:03:29+5:30

रेल्वेस्थानक परिसरातील नवीन तिकीट घराजवळ पारधी बांधवांच्या हाणामारीत दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना सोमवार १३ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडली.

False community in Badnera | बडनेरा येथे पारधी समुदायात धुमश्चक्री

बडनेरा येथे पारधी समुदायात धुमश्चक्री

Next

पती, पत्नी गंभीर : चाकू, काचेच्या बाटलांनी हमला
बडनेरा : रेल्वेस्थानक परिसरातील नवीन तिकीट घराजवळ पारधी बांधवांच्या हाणामारीत दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना सोमवार १३ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडली. महिलेला धारदार शस्त्रासह काचेच्या बाटलीने हल्ला करून जखमी करण्यात आले.
कृष्णा शंकर भोसले (३५, रा. उधणा, गुजरात) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. बऱ्याच दिवसांपासून रेल्वेस्थानक परिसरात पारधी बांधव वास्तव्यास आहेत. सोमवार १३ रोजी रात्री ९ वाजता दोन कुटुंबांमध्ये वाद हाणामारी झाली. आरोपी कृष्णा भोसले व त्याच्या एका साथीदाराने चांदनी अनिल भोसले (२५) व तिचा पती अनिल भोसले (३५,रा.दसरा मैदान झोपडपट्टी) यांना जखमी केले. त्यांना रेल्वे पोलिसांनी इर्विन रुग्णालयात दाखल केले. या घटनेत आरोपींविरुद्ध रेल्वे पोलिसांनी भादंवि ३०७ कलमान्वये गुन्हा नोंदविला. (शहर प्रतिनिधी)

संजीवकुमार पवारचा खून करू!
आरोपीने जखमी दाम्पत्यास नाशिकला जाऊन आपण आपला नेता संजीवकुमार पवारचा खून करू, असे म्हटल्यावर जखमींनी त्याला नकार दिल्यामुळेच आरोपींनी त्या दोघांना धारदार शस्त्राने मारल्याचे फिर्यादी रमजनबाई दीपक शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

रेल्वे पोलिसांचे दुर्लक्ष
बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात विविध ठिकाणच्या लोकांनी आपला ठिय्या जमविला आहे. दुरदूरचे लोक येथे रहिवासास आहे. त्यांच्यामध्ये अनेकदा वाददेखील झाले आहे. रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब गंभीर आहे. पोलिसांनी याकडे लक्ष पुरवावे, असे बोलले जात आहे.

Web Title: False community in Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.