प्रसिद्ध गझलकार ललित सोनोने यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 11:31 PM2021-02-01T23:31:54+5:302021-02-01T23:32:31+5:30
Lalit Sonone : भावस्पर्शी लेखनाने सबंध महाराष्ट्राला कवित्वाचे व गजलांचे वेढ लावनाऱ्या; कविवर्य सुरेश भट यांच्या फळीतील गझलकार तालुक्यातील गुंजी येथील रहिवासी गजलकार ललित सोनोने यांचे सोमवारी रात्री साडेदहा वाजता दरम्यान गुंजी येथे राहत्या घरी निधन झाले.
धामणगाव रेल्वे (अमरावती) -
" भविष्याला जरा न्याहाळले
हाय डोळ्यांनाच या गेला तडा
वाचता येईनाच माझे मला
फाटक्या आयुष्य पानांचा धडा!
"शेतकरी माय माझी घास देई लेकरा
माझिया देही तिच्या रक्तातला वाहे झरा
पेरलो गेलो कधी मातीत मी सांगू कसा?
उगावलो तेव्हाच झालो मी पिकांचा सोयरा!
अशा भावस्पर्शी लेखनाने सबंध महाराष्ट्राला कवित्वाचे व गजलांचे वेढ लावनाऱ्या; कविवर्य सुरेश भट यांच्या फळीतील गझलकार तालुक्यातील गुंजी येथील रहिवासी गजलकार ललित सोनोने यांचे सोमवारी रात्री साडेदहा वाजता दरम्यान गुंजी येथे राहत्या घरी निधन झाले ते ८५ वर्षाचे होते
मागील वर्षी स्थानिक सत्कार समिती व गजल सागर प्रतिष्ठान मुंबई तर्फे जगविख्यात गजलगायक भीमरावजी पांचाळे ह्यांचे हस्ते कवी ललित सोनोने यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता.
गुंजी सारख्या छोट्या गावात जन्म घेतलेले ललित सोनोने यांचा आयुष्याचा प्रवासअतिशय खडतर केला होता त्यांनीअक्षर गिरवत- गिरवत अक्षरावरच खरे प्रेम! गरिबी, दारिद्र, गावकुसाबाहेरच जीवन , जीवन जगण्याची दाहकता ,भोगलेल्या अनुभवाची वास्तवता आपल्या लेखणीने साचेबद्ध करत गेले ! संसार रुपी ओझेत्यांनी पेलले होते पेलत
लोकमत साहित्य जत्राच्या उलगडल्या आठवणी
विधार्थी दशेत विदर्भ महा. अमरावती येथे असतांना कविवर्य सुरेश भट, अण्णासाहेब खापर्डे, मधुकर केचे, उ. रा. गिरी, मनोहर तल्हार , बाबा मोहोड, श्याम सोनारे, जगन वंजारी, ह्यांच्या प्रेरनेने काव्य लेखनाचे नवे भान व मानवी भावविश्वावाची आंतरिक जाण ! यातूनच ललीत सोनोने यांनी आपल्या काव्य लेखनाला सुरवात केली होती.
चांदनवेल' हा सुप्रसिद्ध काव्य संग्रह व '' एक वलय दुःखाचे''या गजल संग्रहामुळे संबंध महाराष्ट्राला परिचीत झाले होते लोकमत साहित्य जत्रामधून त्यांनी वेळोवेळी आपल्या लेखनाने वाचकांना अक्षरशः वेड लावले होते राज्यातील साहित्यिक कवी यांना लोकमत ने त्याकाळी उपलब्ध करून दिलेले साहित्य जत्रेचे व्यासपीठ सर्वात मोठे होते या साहित्य जत्रेत गझलकार ललित सोनवणे यांच्या कविता राज्यभर प्रसिद्ध झाल्या होत्या .त्यांच्यामागे दोन मुले तीन मुली असून मंगळवारी दुपारी 3 वाजता गुंजी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.