बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फरदड धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:57+5:302021-01-04T04:10:57+5:30

अमरावती : कपाशीच्या फरदडीमुळे बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होत नसल्याने पुढीलवर्षीसुद्धा पुन्हा बोंडअळीचा धोका वाढत असल्याने कपाशीची फरदड न घेण्याचे ...

Fardad is dangerous to prevent the spread of bollworm | बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फरदड धोकादायक

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फरदड धोकादायक

Next

अमरावती : कपाशीच्या फरदडीमुळे बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होत नसल्याने पुढीलवर्षीसुद्धा पुन्हा बोंडअळीचा धोका वाढत असल्याने कपाशीची फरदड न घेण्याचे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.

फरदड कापूस म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यांनतर सिंचन उपलब्ध असलेल्या ठिकाणी कपाशीच्या शेतात पाणी देऊन पुनश्च कापूस पीक घेणे होय. अशावेळी पिकापासून जोमदार उत्पन्न मिळण्यासाठी पाणी, खते, कीटकनाशकांचा वापर करून मार्च महिन्यानंतरही कापूस उत्पादन घेतले जातात.

डिसेंबरनंतर कपाशीचे पीक ठेवल्यास गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तिच्या वाढीच्या अवस्थेस आणखी चालना मिळते आणि अळीच्या जीवनक्रमाच्या संख्येत कमी कालावधीत वाढ होते. तसेच बीटी. प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन प्रतिकारकता निर्माण होते. डिसेंबर महिन्यानंतर शेत पुढील पाच ते सहा महिने कापूस पीक विरहीत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते व त्यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो. डिसेंबरनंतर खाद्य उपलब्ध नसल्यास अळी सुप्तावस्थेत जाते. परंतु फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहुन पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापुस पिकावर अळीचा पुन्हा प्रादुर्भाव होतो. या कारणास्तव कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड घेऊ नये. याकरिता कापुस पिकाचा चुरा करणारे यंत्राचा (श्रेडरचा) वापर करावा आणि तयार झालेल्या पिकाचा चुरा गोळा करून सेंद्रीय खतात रुपांतरित करावे. पीक काढणीनंतर खोल नांगरटी करून जमीन उन्हात चांगली तापु द्यावी. पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाट्या, व्यवस्थित न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे पुढील खरीप हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखता येत आसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विजय चवाळे यांनी सांगितले.

बॉक्स

कपाशीचे अवशेष नस्ट करणे महत्त्वाचे

फरदड कपाशीला सिंचन केल्याने पाते, फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंडअळीला तसेच मावा, तुडतुडे, पांढऱ्या माशीला खाद्य उपलब्ध होते. पर्यायाने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आणखी मोठ्या प्रमाणावर होतो. डिसेंबर महिन्यात कपाशीच्या पऱ्हाट्या किंवा वाळलेल्या नख्यांमध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्याची शक्यता असुन पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीच्या शेतातील अवशेष नष्ट करणे आवश्यक आहे.

बॉक्स

बीटीतील प्रथिनांच्या प्रमाणात घट

फरदड कपाशीत लागाणाऱ्या बोंडाचे पोषण चांगले होत नाही, त्यामुळे धाग्याची मजबुती व रुईचा उतारा घटून कापसाला बाजारभाव कमी मिळतो. कापसाची फरदड घेतल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. कापुस पिकाचा कालावधी वाढत जातो त्याप्रमाणे त्यामधील बीटी प्रथिनांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे बोंडअळ्यामध्ये बीटी प्रथिनाविरुध्द प्रतिकारक्षमता निर्माण होते. त्यामुळे पुढील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Fardad is dangerous to prevent the spread of bollworm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.