रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:13+5:302021-06-21T04:10:13+5:30
कावली वसाड : शेतामध्ये काम करत असताना अचानकपणे जंगली डुकराने शेतमजुराला धडक दिल्याने शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. जनावरांना ...
कावली वसाड : शेतामध्ये काम करत असताना अचानकपणे जंगली डुकराने शेतमजुराला धडक दिल्याने शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत.
जनावरांना चारा आणण्यासाठी आपल्या शेतात येथील रहिवासी रमेश ठाकरे गेले असता चारा कापत असतानाच अचानकपणे ठाकरे यांच्यावर जंगली डुक्कर धावत आल्याने ठाकरे हे आपला बचाव करण्यासाठी धावू लागले; परंतु रानटी डुकराने त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्याने रमेश ठाकरे गंभीर जखमी झाले.
या घटनेविषयी माहिती मिळताच गावातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी धामणगाव येथे नेले असता त्यांच्यावर उपचार केले गेले व आता मात्र धोक्याच्या बाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात जंगली जनावरांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिकांच्या, तसेच शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने शेतात काम करणे तारेवरची कसरत झाली आहे.
याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहेत.
===Photopath===
200621\img_20210620_090202.jpg
===Caption===
रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी