किसान सभेचा रस्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 10:27 PM2017-07-26T22:27:11+5:302017-07-26T22:27:52+5:30

भारतीय कम्युनिस्ट पार्टी व किसान सभेच्या वतीने बुधवारी नागपूर-मुंबई महामार्गावरील रहाटगाव चौफुलीवर आंदोलन करण्यात आले.

farmer | किसान सभेचा रस्तारोको

किसान सभेचा रस्तारोको

Next
ठळक मुद्देआंदोलन : शेतकºयांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारतीय कम्युनिस्ट पार्टी व किसान सभेच्या वतीने बुधवारी नागपूर-मुंबई महामार्गावरील रहाटगाव चौफुलीवर आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली.
शेतकºयांच्या संपाचा धसका घेऊन शासनाने कर्जमाफी जाहीर केली. मात्र त्यात अटी व शर्ती समावेश करून शासनाने शेतकºयांचा विश्वासघात केला. याच्या निषेर्धात शेतकºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणाला विरोध करीत समृद्धी महामार्गासाठी एक इंच देखील जमीन देणार नसल्याची शपथ घेतली आहे. समृद्धी महामार्गाला शेतकºयाचा विरोध असताना शासन भूसंपादन कायद्याची अंलबजावणी न करता कमी किमंतीत शेतकºयाचा जमिनी कंत्राटदारांना विकत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शासनाने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतकºयांना जून २०१७ पर्यंतची सरसकट कर्ज माफी द्यावी, शेतीकरिता अत्यल्प व्याजदरात कर्ज पुरवठा करावा, आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.
शासनाच्या जनविरोधी धोरण राबवून शेतकरी व शेतमजूर, कामगारांना देशोधडीला लावण्याचा सपाटा शासनाने चालविल्याचा विरोधात किसान सभा व कम्युनिस्ट पार्टीने रस्ता रोकोच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. यामुळे राष्ट्रीय महार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. या मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, किसान सभेचे अशोक सोनारकर, नामदेव बदरके, भाकपचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, जे.एम कोठारी, उमेश बनसोड, सुनील घटाळे, शिवाजी देशमुख, नारायण भगवे, बी.के.जाधव, पंडीत ढोके, चंद्रकात वडस्कर, विनोद जोशी, गणेश अवझाडे, एम वाय शहाणे, मेघा चौधरी, चंद्रकात बानुबाकोडे, उषा घटाळे यांच्या शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.