शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किसान आझादी आंदोलन
By admin | Published: August 10, 2016 12:05 AM2016-08-10T00:05:40+5:302016-08-10T00:05:40+5:30
सध्या राज्य व केंद्र शासनस्तरावर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न गाजत आहेत. मात्र या ज्वलंत मुद्याकडे शासनाचे लक्ष नाही.
अमरावती : सध्या राज्य व केंद्र शासनस्तरावर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न गाजत आहेत. मात्र या ज्वलंत मुद्याकडे शासनाचे लक्ष नाही. त्यामुळे ९ आॅगस्ट या क्रांतिदिनी किसान आझादी आंदोलनाने मराठा सेवा संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करून शासनाचे लक्ष वेधले
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मुक्ती देण्यात आले, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित व वेतन आयोगाच्या धर्तीवर हमीे भाव देण्यात यावा, गाव तीथे गोदाम निर्माण करण्यात यावे, खते, बियाणे कीटनाशके या कंपन्याकडे शेतकऱ्यांची लुबाडणूक केल्याने सर्व शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, गोधन पाळण्यासठी शासनाने गोधन भत्ता द्यावा, शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा करण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी किसान आझादी आंदोलनाने लक्ष वेधले. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मोहिते, रवींद्र मोहोड, संजय ढोरे, दयाराम जारे, सोपान साबळे, हरिभाऊ लुंगे, सुरेंद्र गावंडे, राजेंद्र ठाकरे व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)