अमरावती जिल्ह्यात शिरखेड परिसरात शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 02:48 PM2020-06-03T14:48:53+5:302020-06-03T14:51:40+5:30
सततची नापिकी, बँकेचे कर्ज, खासगी सावकाराचे देणे तसेच पेरणीकरिता पैशाची तजवीज होत नसल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना मोर्शी तालुक्यात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सततची नापिकी, बँकेचे कर्ज, खासगी सावकाराचे देणे तसेच पेरणीकरिता पैशाची तजवीज होत नसल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना मोर्शी तालुक्यात घडली.
मंगरूळ भिलापूर येथील शेतकरी बाळासाहेब रामदासजी वानखडे (४५) यांनी घोडगव्हाण रस्त्यावरील एका कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेतला. त्यांच्या नावे १० एकर शेती असून बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. पेरणीचे दिवस जवळ आल्यावरसुद्धा पेरणीसाठी पैसे नसल्याने व बियाणे उधार मिळणार नसल्याची चिंता त्यांना सतावत होती. त्यातच शेतीतून पाहिजे तसे उत्पन्न होत नव्हते. तसेच कर्ज परतफेडीची चिंता, यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नागरिकांनी सांगितले. बाळासाहेब यांच्या मागे आई, वडील, पत्नी तसेच मुलगा व मुलगी आसा आप्तपरिवार आहे. घटनेची माहिती मिळताच शिरखेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार बावणे, जमादार हटवार, विनोद धर्माळे हे करीत आहे.