दर्यापूर बाजार समितीवर शेतकरी पॅनेलचे वर्चस्व

By Admin | Published: August 31, 2015 11:57 PM2015-08-31T23:57:49+5:302015-08-31T23:57:49+5:30

अंजनगावप्रमाणेच दर्यापूर बाजार समितीतही आमदार प्रकाश पाटील भारसाकळे व आमदार रमेश बुंदिले यांच्या शेतकरी पॅनेलने १५ पैकी ८ जागांवर वर्चस्व स्थापन करून ऐतिहासिक विजय प्राप्त केला

Farmer panel dominates Daryapur Market Committee | दर्यापूर बाजार समितीवर शेतकरी पॅनेलचे वर्चस्व

दर्यापूर बाजार समितीवर शेतकरी पॅनेलचे वर्चस्व

googlenewsNext

आठ जागा पटकाविल्या : सहकारला चार, किसान पॅनेलला तीन जागा
संदीप मानकर दर्यापूर
अंजनगावप्रमाणेच दर्यापूर बाजार समितीतही आमदार प्रकाश पाटील भारसाकळे व आमदार रमेश बुंदिले यांच्या शेतकरी पॅनेलने १५ पैकी ८ जागांवर वर्चस्व स्थापन करून ऐतिहासिक विजय प्राप्त केला. या निवडणुकीत समता पॅनेलचा सफाया झाला असून प्रतिस्पर्धी सहकार पॅनेलला ४ जागा तर किसान पॅनेलला ३ जागांवर समाधान मानावे लागले.
प्रतिष्ठेच्या १८ जागांसाठी दर्यापूर बाजार समितीमध्ये रंजक निवडणूक झाली. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत शेतकरी पॅनेलला अपयश आले होते. परंतु त्यानंतरही जिल्ह्यातील क्रमांक दोनचे उत्पन्न देणारी सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या दर्यापूर बाजार समितीवर शेतकरी पॅनेलने बाजी मारली. या निवडणुकीत सहकार पॅनेलला ४ तर किसान पॅनेलला तीन जागा मिळाल्या.

समता पॅनेलच्या प्रस्थापितांना धक्का
या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या प्रस्थापिताना धक्का बसला. त्यांना फक्त ४ जागांवर समाधान मानावे लागले. सहकार पॅनेलचे नेतृत्व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सुधाकर भारसाकळे यांनी केले तर बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब वानखडे यांच्या समता पॅनेलला खातेही उघडता आले नाही, तर अरविंद नळकांडे यांच्या सोकारी पॅनेलला निवडणुकीत आपले अस्तित्व टिकविण्यात अपयश आले.

Web Title: Farmer panel dominates Daryapur Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.