शेतकरी प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:16 AM2021-09-05T04:16:43+5:302021-09-05T04:16:43+5:30
भूषण देशमुख, येरड बाजार, ता. चांदुर रेल्वे ,...........,...... सण खेड्यात आणि बाजार शहरात असा दरवर्षीचा शिरस्ता आहे. कोरोना व ...
भूषण देशमुख, येरड बाजार, ता. चांदुर रेल्वे
,...........,......
सण खेड्यात आणि बाजार शहरात असा दरवर्षीचा शिरस्ता आहे. कोरोना व गर्दी कायम आहे. मग पोळ्याच्या सार्वजनिक आयोजनाला बंदी का, याचा प्रशासनाने विचार करावा.
पुरुषोत्तम जाधव, मल्हारा, ता. अचलपूर
,..............
कोरोनामुळे दोन वर्षांपासून मुले एकमेकांपासून दुरावली आहेत. गावातील बाळ गोपाळ तान्या पोळ्याच्या निमित्ताने एकत्र येतात. संघटनशक्तीला बळ मिळते. यंदाही या विधायक गोष्टीला मोडता घातला गेला आहे.
राजेश तायडे, रा. टाकरखेडा मोरे, ता. अंजनगाव सुर्जी
.........
पोळ्याचे तोरण तर बांधले जाईल, पण अशा लपून-छपून होणाऱ्या आयोजनात निर्भेळ आनंद मात्र मिळणार नाही. अपार कष्टातही आनंदाचे क्षण शोधणाऱ्या शेतकऱ्यांची ही विडंबनाच आहे.
सरफराज खान, खंडाळा, ता. नांदगाव खंडेश्वर
---------------
दोन वर्षांपासून कोरोनामुळे पोळा सण सामूहिकरीत्या केला जात नव्हता. परंतु, यावर्षी तोरणाखाली बैलजोडीचे पूजन होईल, अशी स्थिती असतानाच या सणावर निर्बंध आले. साप्ताहिक बाजारात दहा गावचे लोक एकत्रित येतात, त्यावर कुठलेही निर्बंध नाही. परंतु, १० ते १५ मिनिटांसाठी एकत्रित येऊन होणाऱ्या बैलजोडीच्या पूजनाला निर्बंध लावले जातात. मर्यादित स्वरूपात हा शेतकऱ्याचा सण करू द्यायला हवा.
- मुकेश राठी, रा. गव्हा फरकाडे, ता. धामणगाव रेल्वे
------------------------
शेतकऱ्यांचा साथी असलेल्या बैलांना वर्षातून एकदा पूजेचा मान मिळतो. भारतीय कृषिसंस्कृतीत पोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु या परंपरेला हरताळ फासली जात आहे.
- बाळासाहेब मगर्दे, रा. टेंभूरखेडा, ता. वरूड