१५० दिवसांत ९४ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 09:56 PM2018-06-13T21:56:28+5:302018-06-13T21:57:29+5:30

अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उदध््वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, अटी-शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही.

Farmer suicides among farmers in 150 days | १५० दिवसांत ९४ शेतकरी आत्महत्या

१५० दिवसांत ९४ शेतकरी आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देधक्कादायक : दर ३० तासांत शेतकरी कवटाळतोे मृत्यूला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उदध््वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, अटी-शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या पाच महिन्यात म्हणजेच १५० दिवसांत ९४ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. जिल्ह्यात दर ३० तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात ३१ मे २०१८ पर्यंत ३ हजार ४१८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये १ हजार ४२३ प्रकरणे पात्र, १ हजार ९३४ अपात्र, तर ६१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. निराशेच्या गर्तेमधून शेतकरी सावरावा व त्यांचा आर्थिक स्तर उंचावा, यासाठी जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा प्रशासनाद्वारा जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात सकारात्मक परिणाम मिळाले. जिल्ह्यात मात्र या प्रकल्पाला मान्यता मिळाली नाही.
शेतकरी मिशनची उपलब्धी काय?
राज्यात शेतकरी आत्मत्याप्रवण असणाऱ्या १४ जिल्ह्यांसाठी आघाडी सरकारने कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. राज्य शासनाने या मिशनला गती यावी, यासाठी २४ आॅगष्ट २०१५ रोजी या मिशनची पुर्नरचना केली. सध्या यवतमाळचे किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या आतमहत्या रोखण्यास या मिशनला पूर्णपणे अपयश आले आहे.
२००१ पासून ३ हजार ४१८ शेतकरी आत्महत्या
जिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून ३४१८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जानेवारी महिन्यात २६७, फेब्रुवारी २९०, मार्च ३०५, एप्रिल २३९, एप्रिल २८६, मे २५७, जून २६२, जुलै २६२, आॅगस्ट ३२५, सप्टेंबर ३१५, आॅक्टोबर २८५, नोव्हेंबर २७९, तर डिसेंबर महिन्यात २८८ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. यंदा जानेवारीत २३, फेब्रुवारीत २०, मार्च २६, एप्रिल १३ व मे महिन्यात ११ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या.

Web Title: Farmer suicides among farmers in 150 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.