शेतकऱ्याने टमाटे टाकले गुरांना

By admin | Published: April 17, 2016 12:06 AM2016-04-17T00:06:03+5:302016-04-17T00:06:03+5:30

येथील आठवडी बाजारातील पालेभाज्यांच्या परिसरात हर्रासासाठी आणलेले चारशेच्या जवळपास कॅरेट टमाटर भावच मिळत नसल्याने ...

The farmer took the towel | शेतकऱ्याने टमाटे टाकले गुरांना

शेतकऱ्याने टमाटे टाकले गुरांना

Next

भाव नसल्याने शेतकरी संतप्त : परतवाडा येथील घटना
परतवाडा : येथील आठवडी बाजारातील पालेभाज्यांच्या परिसरात हर्रासासाठी आणलेले चारशेच्या जवळपास कॅरेट टमाटर भावच मिळत नसल्याने मध्यप्रदेशच्या शेतकऱ्याने शनिवारी सकाळी गुरांसाठी फेकून दिले.
परतवाडा येथे पालेभाज्या हर्रासाची मोठी बाजारपेठ भरते. येथील आठवडी बाजारात मेळघाट, अंजनगाव, चांदुरबाजार, तालुक्यासह मध्यप्रदेशच्या भैसदेही परिसरातील शिवणी, गुदगाव, धामणगाव, परिसरातील शेतकरी सर्वाधिक प्रमाणात पालेभाज्या विक्रीला आणतात. नेहमीप्रमाणे किसन बारस्कर यांनी आपल्या पाच एकर शेतात टमाटरचे उत्पन्न घेतले. दीड लक्ष रुपये त्यावर त्यांचा खर्च झाला.
आतापर्यंत केवळ तीन हजार रुपये त्यांच्या संताप वाढला आणि त्यांनी टमाटरचे पडलेले दर पाहता थेट गुरांपुढेच मांडून दिले. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात टमाटरची आवक वाढल्याने दोन रुपये किलोपेक्षा कमी दराने त्याची खरेदी सुरू आहे. भैसदेही ते परतवाडापर्यंत शेतकरी किसन बारस्कर यांचा वाहतूक खर्च त्या मजुरीपेक्षा अधिक झाला. त्यामुळे त्यांनी टमाटर गुरांपुढे टाकून दिले असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
कवडीमोल भावामुळे शेतकरी हताश
शेतमाल निघताच मालाचे भाव बाजारपेठेत पडत असल्याची दरवर्षीची ओरड आहे. शेतमाल कुठलाही असो माल घरात येतात व्यापारी भाव पाडतात. शनिवारी परतवाड्याच्या बाजारात भाव मिळेल ही आशा ठेवून टमाटर विक्रीसाठी आणलेल्या एका शेतकऱ्याने बाजारात होणारा लिलाव पाहून टमाटर चक्क गुरांच्या स्वाधीन केले.

Web Title: The farmer took the towel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.