शेतक-यांच्या रुद्रावतारानंतर कृषी अधिका-यांचा शेतातून काढता पाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 04:39 PM2019-08-05T16:39:28+5:302019-08-05T16:39:46+5:30

संतप्त शेतक-यांच्या रोषामुळे जसापूर येथे नुकसानाचे सर्वेक्षण करण्यास गेलेल्या कृषी अधिका-यांना शेतातून काढता पाय घ्यावा लागला.

Farmers anger on agricultural officers | शेतक-यांच्या रुद्रावतारानंतर कृषी अधिका-यांचा शेतातून काढता पाय 

शेतक-यांच्या रुद्रावतारानंतर कृषी अधिका-यांचा शेतातून काढता पाय 

Next

चांदूर बाजार (अमरावती) - संतप्त शेतक-यांच्या रोषामुळे जसापूर येथे नुकसानाचे सर्वेक्षण करण्यास गेलेल्या कृषी अधिका-यांना शेतातून काढता पाय घ्यावा लागला. चांदूर बाजार तालुक्यात संत्र्याची फळगळ मोठी असल्याने शेतकरी जेरीस आले आहेत. दोन वर्षांपासून नागपूर येथील एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजना करूनही ही गळती थांबली नाही. 

तालुक्यातील जसापूर येथे जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी व अकोला येथील कृषी विभागाचे शास्त्रज्ञ हे संत्राउत्पादक शेतकरी अभिजित पोहोकार व प्रदीप बंड यांच्या शेतात गेले. मात्र, नागपूर एनआरसीच्या शास्त्रज्ञांकडून शेतक-यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे सांगत संतापलेल्या शेतकºयांनी या पथकाला शेतातून अक्षरश: हाकलून लावले. यावर्षीच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने मृग बहर हातचा गेला. दुसरीकडे योग्य वातावरणाअभावी फुललेला आंबिया बहर कडाक्याचे उन्ह आणि अज्ञात रोगामुळे गळू लागला आहे. या फळगळतीबाबत कृषी विभागाने दोन वर्षांपासून मार्गदर्शन शिबिर घेतलेले नाही तसेच नेमक्या कोणत्या कारणामुळे फळगळ होते, याचे कारणही स्पष्ट केले नसल्याचा आरोप उपस्थित शेतकºयांनी केले आहे.

नागपूर येथील एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे फवारणी व खताची मात्रा देऊनही संत्र्याला गळती लागली. त्यामुळे गलेलठ्ठ पगार घेणारे शास्त्रज्ञांचा काय उपयोग, असा सवाल संतप्त शेतकºयांनी यावेळी पथकाला केला. शेतकºयांचा रूद्रावतार पाहून कृषी अधिकाºयांनी परतणेच इष्ट समजले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप भारसकळे, मंडळ कृषी अधिकारी यांच्यासह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.
    
फळगळीच्या वेळी न दिसणारा कृषी विभाग व शास्त्रज्ञ त्यानंतर शेतक-यांना भेट देऊन जखमेवर मीठ चोळतात. लाखो रुपये पगार घेऊनही शेतक-यांचे नुकसान होत असेल, तर शासनाने या अधिका-यांवर कारवाई करावी. 
- प्रदीप बंड, शेतकरी, जसापूर  

गतवर्षी पंचायत समिती सभागृहात नागपूर एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी जानेवारी ते फळ तयार होईपर्यंत पाच मार्गदर्शन शिबिरे घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. यावेळी शास्त्रज्ञांनी सूचविलेल्या सूचनेनुसार संत्राउत्पादक शेतकºयांनी पिकांना खत व औषधी दिल्या. तरीही फळगळ थांबली नाही. यानंतर एनआरसीच्या शास्त्रज्ञानी फिरकूनही पाहिले नाही. 
- अभिजित पोहोकार, शेतकरी जसापूर

Web Title: Farmers anger on agricultural officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.