चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:16 AM2021-04-30T04:16:20+5:302021-04-30T04:16:20+5:30

करजगाव : चांदूर बाजार तालुक्यात मूग आणि उडीद ही पिके प्रामुख्याने घेतले जाते. परंतु निसर्गाच्या असमतोलपणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातला घास ...

Farmers in Chandur Bazar taluka deprived of crop insurance | चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित

चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित

googlenewsNext

करजगाव : चांदूर बाजार तालुक्यात मूग आणि उडीद ही पिके प्रामुख्याने घेतले जाते. परंतु निसर्गाच्या असमतोलपणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिसकला गेला. शेतकऱ्यांनी फार आशेने पीक विमा काढला. मात्र, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळालेला नाही.

सामाजिक कार्यकर्ते सागर मोहोड व अन्य शेतकऱ्यांनी ही बाब चांदूर बाजारच्या तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिली व शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा करावा, अशी विनंती केली. यावेळी विक्रांत डोंगरे, पंकज वानखडे उपस्थित होते. शासन अतिवृष्टीची मदत देऊ शकते, तर विमा कंपन्या विम्याचे पैसे देण्यासाठी का टाळाटाळ करीत आहे, असा सवाल करण्यात आला.

Web Title: Farmers in Chandur Bazar taluka deprived of crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.