चांदूर रेल्वेत शहीद दिनी शेतकरी, कामगारविरोधी कायद्यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:13 AM2021-03-25T04:13:49+5:302021-03-25T04:13:49+5:30
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे आयोजन चांदूर रेल्वे : शहरात शहीद दिनानिमित्त शेतकरी, कामगारविरोधी कायदे तसेच वाढीव वीज ...
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे आयोजन
चांदूर रेल्वे : शहरात शहीद दिनानिमित्त शेतकरी, कामगारविरोधी कायदे तसेच वाढीव वीज बिलांचा निषेध मंगळवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे करण्यात आला.
स्थानिक तहसील कार्यालयासमोर शहीद चंद्रशेखर आझाद, शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांसंबंधी केलेल्या तीन काळ्या कायद्याच्या तसेच चार अन्यायकारक कामगार कायद्याच्या व वीज बिल कायद्याच्या विरोधात घोषणा देऊन हे कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली तसेच शहीद भगतसिंग यांच्या स्वातंत्र्याविषयीचे विचारांची थोडक्यात मांडणीसुद्धा करण्यात आली.
कार्यक्रमाला शिवाजीराव देशमुख, विनोद जोशी, विजयराव रोडगे, नितीन गवळी, देविदास राऊत, प्रशांत शिरभाते, अवधूत वाडीभस्मे, रामदास कारमोरे, भीमराव बेराड, प्रभाकर कडू, कृष्णकांत पाटील, विनोद लहाणे, सतीश वानखडे, पुंडलिक मेश्राम, नाना मेंढे, गोपाल मुरायते, अशोक रामटेके, विशाल चव्हाण आदींची उपस्थिती होती.