पेढी धरणावर गळफास घेऊन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:14 AM2021-05-18T04:14:16+5:302021-05-18T04:14:16+5:30

अमरावती : पेढी धरणाच्या भिंतीवर गळफास घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. वामन महादेव मानकर ...

Farmers commit suicide by hanging on Pedi dam | पेढी धरणावर गळफास घेऊन शेतकऱ्यांची आत्महत्या

पेढी धरणावर गळफास घेऊन शेतकऱ्यांची आत्महत्या

googlenewsNext

अमरावती : पेढी धरणाच्या भिंतीवर गळफास घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. वामन महादेव मानकर (७०, रा. वासेवाडी. ता. भातकुली) असे मृताचे नाव आहे.

वामन मानकर यांनी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे. धरणात ८ एकर शेतजमीन गेल्यानंतर सरकारकडून अल्प मोबदला मिळाल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. सोमवारी दुपारी काही गावकऱ्यांना त्यांचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या पेढी धरणाच्या भिंतीवर लटकलेल्या अवस्थेत आढळला. वामन मानकर हे भातकुली येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत पैसे काढण्यास गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना उद्धट वागणूक दिली व त्रास दिला. ८ एकर शेतीच्या मिळालेल्या अत्यल्प मोबदल्यात कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच रवि राणा यांनी तत्काळ वासेवाडी गावात कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेस जबाबदार असलेल्या बँक अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

साततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी त्रस्त असून, मुख्यमंत्र्यांनी आतातरी जागे व्हावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार रवि राणा यांनी केली. धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचेही आ. राणा म्हणाले.

चौकट

वासेवाडी येथील वामन मानकर यांनी बँकेच्या जाचाला कंटाळून पेढी बांधावर गळफास घेऊन आत्महत्या केली. धरणात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने व सततच्या नापिकीला कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपवली. आत्महत्याग्रस्त मानकर कुटुंबाला तात्काळ १० लाख रुपये मदत द्यावी.

- रवि राणा, आमदार, बडनेरा

--------------------

Web Title: Farmers commit suicide by hanging on Pedi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.