सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:12 AM2020-12-25T04:12:09+5:302020-12-25T04:12:09+5:30
पान ३ साठी तिवसा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करून मंजूर करून घेतलेल्या गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेतून अनेक शेतकऱ्यांची शेती ...
पान ३ साठी
तिवसा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करून मंजूर करून घेतलेल्या गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेतून अनेक शेतकऱ्यांची शेती वगळण्यात आल्याने संताप निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने लढा संघटनेच्यावतीने ना. बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले.
अप्पर वर्धा धरणातून मोझरी आणि इतर शेतीभागाला एक थेंब पाणी मिळत नाही. त्याकरिता शेतकऱ्यांनी २००२ पासून साखळी तथा बेमुदत उपोषण केले. विभागीय आयुक्त कार्यालयात घंटानाद मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आमदार बच्चू कडू आणि संजय देशमुख यांनी सतत पाठपुरावा करून तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या कडून गुरुकुंज उपसा जलसिंचन योजना मंजूर करून घेतली. मोझरीच्या आजूबाजूचा भाग सुजलाम सुफलाम होईल, अशी आशा असताना शेंदोळा बु, सालोरा, धोत्रा या गावातील संपूर्ण भाग तसेच वऱ्हा हे गाव योजनेच्या लाभापासून वंचित राहिली आहेत. शेतीला पाणी मिळाले नाही, तर शेतकरी आंदोलन करण्याचा तयारीत असल्याचे ना. कडू यांना सांगण्यात आले. निवेदन देताना लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, मुरली मदनकर, मनोहर वाढोनकर, विलास इंगोले, श्रीराम समरीत, मोतीराम गायकवाड, जीवन उमप, विजय डेहनकर, ओंकार कळंबे, घनश्याम गाढवे, काजळकर आदी शेतकरी उपस्थित होते.
--------------------