शेतकऱ्याची मुलगी नाबार्डच्या अधिकारी पदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:14 AM2021-04-23T04:14:07+5:302021-04-23T04:14:07+5:30
फोटो पी २२ अर्पिता भोजने चांदूरबाजार : तालुक्यातील बोदड येथील शेतकरी नरेश श्रीराम भोजने यांची मुलगी अर्पिता भोजने हिची ...
फोटो पी २२ अर्पिता भोजने
चांदूरबाजार : तालुक्यातील बोदड येथील शेतकरी नरेश श्रीराम भोजने यांची मुलगी अर्पिता भोजने हिची नाबार्डच्या माध्यमातून बॅंकेच्या सहाय्यक व्यवस्थापक पदी नियुक्ती झाली आहे. लखनऊ येथे प्रशिक्षण पूर्ण करून १९ एप्रिलला बंगलोर येथे तिने पदभार स्वीकारला आहे. यामुळे बोदडच्या अर्पिताने आपल्या कर्तृत्वाचा डंका अटकेपार रोवला आहे.
अर्पिता ही याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या, मुंबई शाखेत कार्यरत होती. तिने आपले शिक्षण बि.ई. संगणक शाखेमधून पुणे येथून पूर्ण केले आहे. बि.ई.पूर्ण झाल्या नंतर कॅम्पसमधून विप्रो कंपनीत तिची निवड झाली होती. परंतू तिला बॅंकिंग क्षेत्रात करिअर करायचे होते. त्यामुळे तिने बॅंकिंगच्या परिक्षा देत आधी आरबीआय व आता नाबार्ड बॅकेत सेवा देत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय, आई वडिलांसह आपल्या गुरूजनांना दिले आहे.