शासकीय हरभरा खरेदीसाठी शेतकरी जिल्हाकचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:13 PM2019-03-08T22:13:33+5:302019-03-08T22:14:21+5:30

शासकीय हरभरा खरेदीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाकचेरीवर धडक दिली.

Farmer's District Collector for purchase of Government gram | शासकीय हरभरा खरेदीसाठी शेतकरी जिल्हाकचेरीवर

शासकीय हरभरा खरेदीसाठी शेतकरी जिल्हाकचेरीवर

Next
ठळक मुद्देसोमवारपर्यंत अल्टिमेटम् : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती : शासकीय हरभरा खरेदीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाकचेरीवर धडक दिली.
राज्य शासनाने अद्यापही शासकीय हरभरा खरेदीची नोंदणी व खरेदीबाबत कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे व्यापाºयांकडून प्रतिक्विंटल १२०० ते १३०० रूपये फरकाने सर्रास शेतकऱ्यांची लूट होत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे. तातडीने हरभरा खरेदीची नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांच्याकडे आ. जगताप यांनी रेटून धरली. तुरीचे चूकारे, बोंडअळी अनुदान, समृद्धी महामार्गातील शेतकºयांच्या तक्रारीवर कारवाई, चांदूर रेल्वे तालुका व शहरातील पाणी टंचाई, बियाणे कंपन्यांकडून बोगस बियाणे पुरवठ्यामुळे अमरावती व इतर तालुक्यातील १८५ कोटींच्या नुकसानाची भरपाई आदी मुद्यांवर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून न्याय देण्याची मागणी केली. हरभरा खरेदीची प्रक्रिया सोमवारपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन सहकार विभागाचे अधिकाऱ्यांनी दिले. यासंदर्भात सोमवार कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. यावेळी झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख सदस्या वासंती मंगरोळे, पूजा हाडोळे, अलका देशमुख, वंदना करूले, हरिभाऊ मोहोड, सुरेश निमकर, नितीन दगडकर, गणेश आरेकर, नगराध्य सिटू सूर्यवंशी, प्रदीप वाघ, हरिभाऊ गवर्इंसह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Farmer's District Collector for purchase of Government gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.