शेतकºयांची महावितरणवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:05 PM2017-11-06T23:05:04+5:302017-11-06T23:05:20+5:30
तालुक्यातील निंभी सबडिव्हिजन अंतर्गत येणाºया गावांमध्ये भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी मोर्शी येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयावर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : तालुक्यातील निंभी सबडिव्हिजन अंतर्गत येणाºया गावांमध्ये भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी मोर्शी येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयावर धडक दिली. यामुळे येथे तणाव वातावरण निर्माण झाला होता.
यंदा पावसाने दडी दिल्याने खरीप हंगाम बुडीत असल्यात जमा झाला. यामुळे शेतकºयांसाठी रबी हंगाम महत्त्वाचा आहे. शेतकºयांनी रबीची पेरणी केली. मात्र, सिंचनासाठी विजेची गरज असताना भारनियमन होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. निंभी सबडिव्हिजन अंतर्गत ेयेणाºया लिहिदा, नया वाठोडा, पुसला, इनापूर, पिंपळखुटा (मोठा) येथील कृषिपंपांचा पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रबी सिंचन दुरापास्त झाले आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून विजेचा लंपडाव सुरू असल्याने शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे. यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी मोर्शी येथील विभागीय कार्यालयावर धडक दिली.
मोर्चात अमर गोमकाळे, सारंग देशमुख, सागर देशमुख, किशोर तट्टे, मनोहर झगडे, आशिष पाटणकर, सचिन टेकाडे, तुकाराम कुरवाळे, पंजाबराव टारपे, सुनील ठवळी, बाळू खैरकर, तानासिंग चव्हाण, मारुती कुरवाळे, अनिल घुलक्षे, प्रशांत वाघाडे, अनिल चरडे आदी शेतकरी उपस्थित होते.
विजेचे अस्तित्व काही मिनिटांपुरतेच
रबी पेरणीच्या सिंचनासाठी विजेची गरज असताना तिचे अस्तित्व केवळ वीस ते तीस मिनिटाच्या अवधीसाठीच असते. पुन्हा वीजपुरवठा खंडित होतो. हाशमपूर रोहित्राचा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो याला नागरिकच नव्हे तर आता चक्क महावितरणचे कर्मचारी कंटाळले आहेत. स्थानिक अभियंत्याचे प्रयत्न तोकडे पडत असल्याने समस्यांमध्ये भर पडत आहे. नवीन रोहित्र बदलवून सहा महिने उलटले असतानाही वीजपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळेही अडचणीत भर पडली आहे.