शेतकरी, शेतमजूर रॅली
By admin | Published: April 10, 2015 12:28 AM2015-04-10T00:28:28+5:302015-04-10T00:28:28+5:30
प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात भूमी अधिग्रहणसारख्या कायद्याने शेतकरी विरोधी धोरण राबवून या देशातील शेतकऱ्यांना ...
अमरावती : प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात भूमी अधिग्रहणसारख्या कायद्याने शेतकरी विरोधी धोरण राबवून या देशातील शेतकऱ्यांना भूमिहीन करून त्यांचा संसार मातीत मिळविण्याचे काम भारतीय जनता पार्टी करीत आहे. विदर्भातील सर्वाधिक आत्महत्या हे स्पष्टपणे दाखवत आहे की, राज्यातील व केंद्रातील सरकारचे धोरण हे शेतकरी व शेतमजूर विरोधी आहे. विदर्भातील वाढत्या आत्महत्येला महाराष्ट्र शासन जबाबदार आहे.
भूमी अधिग्रहण अध्यादेशाचा निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात १९ एप्रिलला रामलिला मैदान दिल्ली येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनात भाग घेण्यासाठी सर्व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, महापौर, सर्व नगरसेवक, माजी खासदार, माजी आमदार, ज्येष्ठ नेते यांनी दिल्ली येथे रॅलीत उपस्थित राहावे असे आव्हान अमरावती शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष संजय अकर्ते, महानगरपालिका गटनेता बबलू शेखावत, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, शहर काँग्रेसचे प्रवक्ता अनिल बोके यांनी केले आहे. (प्रतिनिधी)