शेतकऱ्यांचा शेतीपूरक व्यवसायाकडे कल

By admin | Published: September 8, 2015 12:15 AM2015-09-08T00:15:46+5:302015-09-08T00:15:46+5:30

तालुक्यातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे आता तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन प्रकल्पाकडे वळले आहे.

Farmers' Farming Business tomorrow | शेतकऱ्यांचा शेतीपूरक व्यवसायाकडे कल

शेतकऱ्यांचा शेतीपूरक व्यवसायाकडे कल

Next

रेशीम लागवडीतून घेतात दीड लाखांचे उत्पादन : कुटुंबाला मिळाला आधार
चांदूरबाजार : तालुक्यातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे आता तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन प्रकल्पाकडे वळले आहे. तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायातूनच आपली उपजिविकेचा प्रयत्न चालविला आहे.
तालुक्यातील युवा शेतकरी तथा महिला शेतकरी यांनी शेतीपुरक व्यवसाय करताना दिसतात यात सहा एक्कर शेती असणाऱ्या सुधीर महल्ले या युवा शेतकऱ्याने प्रथम आपल्ळा दोन एक्कर शेतीमध्ये तुती लागवड करून रेशनम कोष प्रकल्प चालविण्याचा कार्याला सुरूवात केली तर जसापूर येथील महिला शेतकरी रेखा ठाकरे व नीलेश ठाकरे यांनी ही आपल्या दोन एक्कर शेतीमध्ये तुतीची लागवड करून शेतीपुरक तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन प्रकल्प उभारला आहे. याकरिता अमरावती रेशीम संचालयाचे सहसंचालक ढवळे व तालुका समन्वयक माने यांचे मार्गदर्शनातून हे शेतकरी या शेतीपुरक उद्योगातून पाच ते सहा पिकांवर एक ते दीड लाख रूपये उत्पन्न घेतात.
या दोन्ही शेतकऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी गेल्या चार वर्षापासून पर्यावरण पुरक शेती ही शेतकऱ्यांसाठी तोट्याची ठरत असून यातून शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होतोच पण पूर्ण कुटूंब सततच्या नापिकीमुळे त्रस्त होते. अशात आता शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायाशिवाय पर्याय उरला नाहीच असे मत सुधीर महल्ले व नीलेश ठाकरे यांनी व्यक्त केले. तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन प्रकल्पाला येणारा खर्च अल्प असून वर्षाकाठी एक ते दीड लाख रूपयांचे उत्पन्न या व्यवसायातून मिळणार असून तुती लागवडीनंतर किटकनाशक फवारणी तथा कोणत्याही प्रकारचे खत तुतीचे पीक वाढविण्यासाठी लागत नसून केवळ एकच माणून हा व्यवसाय निटपणे करू शकतो.
हमखास पन्नास ते साठ हजार रूपये वर्षाअंती कमवू शकतो, असे मत रेखा ठाकरे यांनी व्यक्त केले. सततच्या नापिकीमुळे शेतकरी शेतीपुरक व्यवसायाच्या शोधात असून यातील काही शेतकरी रेशीम कोष प्रकल्प तर काही शेतकरी दूध व्यवसाय तर काही शेतकरी शेतातच पोल्ट्री फॉर्म उभारून शेतीपुरक व्यवसाय करीत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. यातही तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन प्रकल्पातून निघणाऱ्या रेशीम कोषाला बाजारपेठेत चांगले मत असल्यचे चांदूरबाजार तालुक्यातील शेतकरी या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmers' Farming Business tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.