संत्रा, गहू, चण्याच्या नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:14 AM2021-03-26T04:14:04+5:302021-03-26T04:14:04+5:30

पंचनाम्याची मागणी : मोर्शी : तालुक्यात चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे संत्रा, गहू, चना, ...

Farmers in financial crisis due to loss of oranges, wheat and gram | संत्रा, गहू, चण्याच्या नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात

संत्रा, गहू, चण्याच्या नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Next

पंचनाम्याची मागणी :

मोर्शी : तालुक्यात चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे संत्रा, गहू, चना, मका, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली.

गहू, हरभऱ्यासह भाजीपाला, संत्रा, मोसंबी, आंबा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वातावरण अचानक ढगाळ होऊन जोरदार हवेसह आलेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे फळबागांनाही फटका बसला आहे. या नुकसानाची दखल घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावे, त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी महिला व बाल कल्याणच्या माजी सभापती वृषाली विघे, बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, विलास राऊत, उमेश गुडधे, सुनील केचे, सतीश गतफने, समीर विघे, निखिल फलके, दिनेश वाळके, दिनेश अंधारे यांनी केली आहे.

Web Title: Farmers in financial crisis due to loss of oranges, wheat and gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.