पीक विम्यात ‘शेतकरी कंगाल, कंपन्या मालामाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 12:01 AM2022-11-10T00:01:05+5:302022-11-10T00:03:00+5:30

पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदा ‘हंगामातील प्रतिकूल परिस्थिती’ या घटकांतर्गत बाधित मूग, उडदाला परतावा व जिल्हाधिकाऱ्यांनी ८० महसूल मंडळांसाठी अधिसूचना काढली असल्याने सोयाबीनला आतापर्यंत विमा परताव्याचा २५ टक्के अग्रीम मिळायला पाहिजे होता. मात्र, पीक विम्यात सहभागी एकाही शेतकऱ्यांना कंपनीद्वारा परतावा दिलेला नसल्याने पीक विम्यात फक्त कंपनीचेच चांगभले होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

'Farmers poor, companies rich' in crop insurance | पीक विम्यात ‘शेतकरी कंगाल, कंपन्या मालामाल’

पीक विम्यात ‘शेतकरी कंगाल, कंपन्या मालामाल’

Next

गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी परतावा मिळण्यासाठी यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी २०.४४ कोटींचा पीक विमा हप्ता भरला. राज्य व केंद्र शासनाचे हिस्सा मिळून पीक विमा कंपनीकडे किमान १०० कोटी रुपये जमा होत आहे. त्या तुलनेत बाधित शेतकऱ्यांना छदामही मिळाला नसल्याने पीक विम्यात ‘शेतकरी कंगाल, कंपन्या मालामाल’ असल्याचे वास्तव आहे.
पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदा ‘हंगामातील प्रतिकूल परिस्थिती’ या घटकांतर्गत बाधित मूग, उडदाला परतावा व जिल्हाधिकाऱ्यांनी ८० महसूल मंडळांसाठी अधिसूचना काढली असल्याने सोयाबीनला आतापर्यंत विमा परताव्याचा २५ टक्के अग्रीम मिळायला पाहिजे होता. मात्र, पीक विम्यात सहभागी एकाही शेतकऱ्यांना कंपनीद्वारा परतावा दिलेला नसल्याने पीक विम्यात फक्त कंपनीचेच चांगभले होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
 नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, यासाठी कृषी विभागाने जनजागृती केली. यामध्ये २.१९ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवीत दोन टक्के म्हणजेच २०,४३,४७,७७२ रुपयांचा हप्ता भरला, याशिवाय उर्वरित ९८ टक्के हिस्सा राज्य व केंद्र शासन भरणार आहेत. ८० कोटींचा हिस्सा शासनाचा राहणार आहे.

पिकनिहाय शेतकरी हिस्सा
कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या खरिपात २.१९ लाख शेतकऱ्यांनी २०.२३ कोटींचा विमा हप्ता भरला आहे. यामध्ये उडदासाठी ५९.२० लाख, मुगासाठी १.१२ कोट, कपाशी ४.३६ कोटी, धान १४,७२४ रुपये, तूर १.११ कोटी, ज्वार १.९३ लाख व सोयाबीनसाठी सर्वाधिक १३.२५ कोटी रुपयांचा प्रीमियम शेतकऱ्यांनी कंपनीकडे भरणा केला आहे.

तालुकानिहाय शेतकरी प्रीमियम 
अचलपूर तालुक्यात ७०.०७ लाख, अमरावती १.४० कोटी, अंजनगाव सुर्जी १.५६ कोटी, भातकुली १.८४ कोटी, चांदूर रेल्वे १.२४ कोटी, चांदूरबाजार १.०७, चिखलदरा ११.४० लाख, दर्यापूर ३ कोटी, धामणगाव १.२९ कोटी, धारणी २२.७३ लाख, मोर्शी १.५९ लाख, वरूड ४६.५७ लाख, तिवसा १.७३ कोटी व नांदगाव तालुक्यात ४.१८ कोटींचा प्रीमियम शेतकऱ्यांनी भरला.

अधिसूचनेवरील कंपनीचे आक्षेप निकाली काढले आहे. पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा परताव्याचा अग्रिम द्यावा, यासाठी कंपनीला पत्र दिले आहे. कृषी आयुक्तालयानेही कंपनीला पत्र दिलेले आहे.
 - अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

Web Title: 'Farmers poor, companies rich' in crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.