शेतकऱ्यांजवळील माल संपला आणि हरभरा ७,२५० रुपयांवर गेला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:58 AM2024-08-13T11:58:05+5:302024-08-13T11:59:04+5:30

वर्षभरात पहिल्यांदा उच्चांकी भाव : आवक कमी, मागणी वाढली

Farmers run out of supplies and gram goes up to Rs 7,250! | शेतकऱ्यांजवळील माल संपला आणि हरभरा ७,२५० रुपयांवर गेला!

Farmers run out of supplies and gram goes up to Rs 7,250!

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
यंदा केंद्र शासनाने हरभऱ्याला ५,४४० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्या तुलनेत वर्षभर दर पाच हजारांच्या दरम्यान राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च पडलेला नाही.


सध्या साठवणूक केलेला हरभरा शेतकऱ्यांजवळ नाही. अशा परिस्थितीत आवक कमी झाली व सणासुदीच्या दिवसांत मागणी वाढली. नवीन हरभऱ्याला अवधी आहे. त्यामुळे हरभऱ्याला सोमवारी उच्चांकी ७,२७२ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. जमिनीत आर्द्रता कमी असल्याने गतवर्षी हरभऱ्याच्या सरासरी उत्पादनात कमी आली आहे. 


हंगामापूर्वीच सोयाबीन हमीभावाच्या आत
केंद्र शासनाने सोयाबीनचा हमीभाव ४,८९२ रुपये क्विंटल असा जाहीर केला आहे. दीड महिन्यात नवे सोयाबीन बाजारात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला ४१०० ते ४१७७ रुपये भाव मिळाला आहे. यामध्ये उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे.


हरभऱ्याचे बाजारभाव (रु/क्विं)
१५ जुलै - ६००० ते ६३५०
१९ जुलै - ६००० ते ६४००
२४ जुलै - ६३०० ते ६५६०
३१ जुलै - ६२०० ते ६५६२
५ ऑगस्ट - ६६५० ते ६९६९
७ ऑगस्ट - ६७०० ते ७०४०
१२ ऑगस्ट - ७००० ते ७२७२


"सध्या सोयाबीन पेंडला बाजारात मागणी कमी असल्याने दरवाढ होण्याची शक्यता नाही. सणासुदीत हरभऱ्याची मागणी वाढत असल्याने थोडीफार दरवाढीची शक्यता आहे."
- संजय जाजू, व्यापारी
 

Web Title: Farmers run out of supplies and gram goes up to Rs 7,250!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.