शेतकऱ्यांचे ‘शोले’

By admin | Published: May 31, 2017 12:25 AM2017-05-31T00:25:56+5:302017-05-31T00:25:56+5:30

तालुक्यातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना एक वर्षापासून मंजूर झालेले अनुदान अद्यापही मिळाले नसल्याने...

Farmers 'Sholay' | शेतकऱ्यांचे ‘शोले’

शेतकऱ्यांचे ‘शोले’

Next

प्रहारचे नेतृत्व : पोलिसांचा तगडा बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : तालुक्यातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना एक वर्षापासून मंजूर झालेले अनुदान अद्यापही मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी प्रहारचे विजय पाचारे यांच्या नेतृत्वात हिवरखेड येथील पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी पद्धतीने आंदोलन केले.
गारपीटग्रस्तांना मंजूर झालेले अनुदान तत्काळ देण्यात यावे, उष्ण तापमानामुळे संत्रा, आंबिया फळांची गळती होऊन अतोनात नुकसान झाले. अश्या शेतकऱ्यांना शासनाने सर्व्हे करून हेक्टरी ५० हजार रूपये अनुदान जाहीर करावे. खरीप हंगामासाठी सरसकट शेतकऱ्यांना १५ दिवसाच्या आता बिनाअट कर्जपुरवठा करण्यात यावा. हे अभिनव आंदोलन सकाळी ९ वाजतापासून सुरू करण्यात आले. दरम्यान संतप्त आंदोलकांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी येणार नाही, तोपर्यंत शेतकरी पाण्याचे टाकीवरून खाली उतरणार नाही. जर जिल्हाधिकारी यांनी हिवरखेड येथे येऊन शेतकऱ्यांच्या मुख्य समस्या निकाली काढतील तरच टाकीवरून खाली उतरू किंवा आत्मदहन करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
आंदोलन चिघळत असल्याचे पाहून मोर्शीचे तहसीलदार अनिरुद्ध बक्षी, ठाणेदार नंदकिशोर शर्मा हे आपल्या अधिनस्त पोलीस ताफ्यासह आंदोलनस्थळी दाखल झाले. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य पाहून तहसीलदार अनिरुद्ध बक्षी यांनी आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या रास्त असून त्या मी शासनाच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करतो, असे लेखी आश्वासन देऊन १५ दिवसांच्या आत गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात येईल, असेसुद्धा लेखी आश्वासन दिल्याने शेवटी शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

Web Title: Farmers 'Sholay'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.