एका रात्रीतून शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:15 AM2021-09-12T04:15:45+5:302021-09-12T04:15:45+5:30

चांदूर रेल्वे तालुक्यात माजी आमदारांकडून पाहणी; घरांची पडझड चांदूर रेल्वे : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पीक जमीनदोस्त ...

Farmers' standing crops landlord overnight | एका रात्रीतून शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त

एका रात्रीतून शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त

Next

चांदूर रेल्वे तालुक्यात माजी आमदारांकडून पाहणी; घरांची पडझड

चांदूर रेल्वे : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पीक जमीनदोस्त झाली. धानोरा पळसखेड, सोनोरा, राजुरा आदी गावांतील शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या शेताची पाहणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केली. तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली.

सतत दोन दिवसांपासून पडत असलेला मुसळधार पावसामुळे तालुक्यातील चारही तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अनेक लोकांचे घरे व शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मांजरखेड कसबामधील पाताळेश्वर मंदिर पाण्याखाली होते. पळसखेड मार्ग बंद होता. सोनारा येथील शेतकरी गजानन जुनघरे यांची पाच एकरातील पऱ्हाटी पूर्णतः वाहून गेली. त्यांच्या शेतालाही माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी भेट दिली. महादेव घाट परिसरातील तीन लोकांचे घर पडले. तालुक्यात ग्रामीण भागात सुद्धा अनेक नागरिकांच्या भिंती पडल्या. वीरेंद्र जगताप यांच्या पाहणीदरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी सभापती जगदीश आरेकर, रविकांत देशमुख, भीमराव महानर, धनराज भावने, संजय खंडेझोड, नूरखाँ पठाण, बालू गोंडाणे, विलास खोब्रागडे आदी उपस्थित होते.

Web Title: Farmers' standing crops landlord overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.