संत्राबागा वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड

By admin | Published: May 31, 2014 11:10 PM2014-05-31T23:10:24+5:302014-05-31T23:10:24+5:30

परिसरातील बोराळा, पथ्रोट, शिंदी काकडा, धनेगाव आदी परिसरात संत्राबागा जगविण्यासाठी शेतकर्‍यांनी एक हजार फुटापर्यंत जमिनीत बोअर केलेत. या भागात बहुतांश चोपण जमिनीमुळे बोअर करण्याची

Farmers' struggle to save Santoshbag | संत्राबागा वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड

संत्राबागा वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड

Next

अंजनगाव सुर्जी : परिसरातील बोराळा, पथ्रोट, शिंदी काकडा, धनेगाव आदी परिसरात संत्राबागा जगविण्यासाठी शेतकर्‍यांनी एक हजार फुटापर्यंत जमिनीत बोअर केलेत. या भागात बहुतांश चोपण जमिनीमुळे बोअर करण्याची र्मयादा एक हजार फुटापर्यंत गेली आहे. भू-भौतिक उष्णतेमुळे अशा बोअरचे पाणी हाताला जाणवण्याइतपत गरम लागत आहे.
 मार्गदर्शनाअभावी शेतकर्‍यांचे अधिक नुकसानीसेाबतच पाण्याचा अनिर्बंध व्यवहार चालू आहे. जमिनीत पाणी आटले म्हणून परिसरातील सधन शेतकरी अधिकाधिक खोल पाणी शोधत आहेत. यावर्षी असे खोल बोअर घेण्याची स्पर्धा लागली असून एक हजार फूट बोअर करणे प्रतीस्पर्धीचे झाले आहे. पण यामुळे संबंधित श्ेातकर्‍यांचे अधिक नुकसान होत आहे. पर्यावरणाचा आणि गरीब शेतकर्‍यांचा पाणी प्रश्न बिकट झाला आहे.
वास्तविकत: या भागात तिनशे फुटावरच पाणी उपलब्ध असून पाचशे फुटापर्यंंत बोअरवर बागा चांगल्या अस शकतात; पण अधिक खोल जाणे हिताचे असल्याचा बोअरवेल मशिनधारक प्रचार करीत असल्यामुळे शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
 प्रतिफूट १८0 रु. असा बोअरचे शुल्क आकाराले जातात. कमीतकमी पाचशे फूट बोअर करणे बंधनकारक आहे. तेव्हाच मशीन शेतात येते. ही पातळी पुरेशी असल्यावरही उर्वरित तीनशे ते पाचशे फूट अतिरीक्त खोलीला बोअरचा आर्थिक ताण शेतकरी कोसत आहेत. जास्तीचे बोअर, केसिंगसाठी दीड लाख रुपये खर्च येत आहे. शेतकर्‍यांचे बोअर फेल गेले आहे. (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Farmers' struggle to save Santoshbag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.