शेतकऱ्यांनी घेतला नवीन कृषीपंप वतज धोरणाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:12 AM2021-03-14T04:12:53+5:302021-03-14T04:12:53+5:30

धामणगाव रेल्वे : कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देणे तसेच कृषी वाहिन्यांवर दिवसा आठ तास वीजपुरवठा करणे, कृषी पंपाकरिता पायाभूत सुविधा ...

Farmers took advantage of the new agricultural pump vataj policy | शेतकऱ्यांनी घेतला नवीन कृषीपंप वतज धोरणाचा लाभ

शेतकऱ्यांनी घेतला नवीन कृषीपंप वतज धोरणाचा लाभ

Next

धामणगाव रेल्वे : कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देणे तसेच कृषी वाहिन्यांवर दिवसा आठ तास वीजपुरवठा करणे, कृषी पंपाकरिता पायाभूत सुविधा उभारणे आणि टप्प्याटप्प्याने सवलती देत थकबाकी वसूल करणे या धोरणाचा तालुक्यातील २५० शेतकऱ्यांनी लाभ घेतला. यासाठी निंभोरा बोडखा येथील सर्वाधिक शेतकरी पात्र ठरले आहे.

राज्य शासनाने सन २०२० अंतर्गत कृषी वीज देयक थकबाकीदारांना वीजबिल भरण्यासाठी आकर्षक सवलती घोषित केल्यात. ८० शेतकऱ्यांनी आपले बिल कोरे केले आहे. २५० शेतकऱ्यांनी चालू बिलाचा भरणा केला आहे. पिंपळखुटा येथील ग्रामस्थांनी देयक भरल्याने कृषी वीज देयक अंतर्गत गावातील डीबीची दुरुस्ती करून पायाभूत सुविधा पुरविण्यात आल्या. निंभोरा बोडखा येथील सर्वाधिक ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे येथील प्रगतिशील शेतकरी विजय पाचबुधे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर, उपविभागीय अभियंता यू.के. राठोड, कनिष्ठ अभियंता साहू यांची उपस्थिती होती.

Web Title: Farmers took advantage of the new agricultural pump vataj policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.