गावनेर तळेगाव येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:14 AM2021-02-11T04:14:01+5:302021-02-11T04:14:01+5:30
मंगरूळ चव्हाळा : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजा गावनेर तळेगाव येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत चंदा अशोक देशमुख यांच्या ...
मंगरूळ चव्हाळा : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजा गावनेर तळेगाव येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत चंदा अशोक देशमुख यांच्या शेतात हरभरा प्रक्षेत्रावर जमीन आरोग्यपत्रिका प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथील के.पी. सिंग यांनी माती परीक्षणाच्या आधारावर पिकांचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय कर्ब, जमिनीचा सामू, जमिनीत उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म मूलद्रव्यांची मात्रा आदी विषयांवर मार्गदर्शन केले. नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी पुढील हंगामाकरिता सोयाबीन बियाणे साठवणूक व उन्हाळी सोयाबीन उत्पादनाबाबत माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी इंदोरे यांनी गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन व कापूस फरदड निर्मूलनाबाबत सविस्तर माहिती दिली. आभार प्रदर्शन कृषी सहायक पुरुषोत्तम वंजारी यांनी केले.यावेळी कृषी सहायक पी.यू. लाडके, यू.एस. रायबोले , सचिन आंदळे, शरद महाले तसेच महिला बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.