गारपिटीच्या नुकसानाची शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:13 AM2021-03-25T04:13:29+5:302021-03-25T04:13:29+5:30

नांदगाव खंडेश्वर : गतवर्षी मार्च महिन्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाबद्दल तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळणार असल्याचे तालुका सेवादल काँग्रेसचे ...

Farmers will get compensation for hail damage | गारपिटीच्या नुकसानाची शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

गारपिटीच्या नुकसानाची शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

Next

नांदगाव खंडेश्वर : गतवर्षी मार्च महिन्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाबद्दल तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळणार असल्याचे तालुका सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर बगळे यांनी सांगितले. त्याचा माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी पाठपुरावा केला होता.

तालुक्यातील गटग्रामपंचायत खानापूर, मलकापूर, गोळेगाव, जगतपूर, सालोड, ढंगाळा, पळसमंडळ, खंडाळा, धर्मापूर, ढवळसर, देऊळगव्हाण परिसरातील शिवारात १८ मार्च २०२० ला झालेल्या गारपिटीमुळे शेतातील गहू, हरभरा, भुईमूग तसेच संत्रा फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते. यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी शिवारात नुकसानाची पाहणी केली व शेतकऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठून गारपीटीने तालुक्यात झालेल्या नुकसानाची व्यथा मांडली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत तालुक्यातील मनोहर बगळे, योगेश गावंडे, प्रमोद इंझळकर, गणेश शृंगारे, गोरखनाथ शृंगारे, प्रवीण लळे, अनंत राणे, माधव इंझळकर, विष्णू नेवारे व परिसरातील शेतकरी मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली होती.

Web Title: Farmers will get compensation for hail damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.