जनता दलाच्या मोर्चात शेतकरी, शेतमजुरांचा सहभाग
By admin | Published: April 12, 2016 12:28 AM2016-04-12T00:28:57+5:302016-04-12T00:28:57+5:30
जनता दल सेक्युलरच्यावतीने सोमवारी आयोजित मोर्चात शेतकरी, शेतमजुरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता़ तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले़
पांडुरंग ढोलेंचा पुढाकार : तालुका प्रशासनाला निवेदन
धामणगाव (रेल्वे) : जनता दल सेक्युलरच्यावतीने सोमवारी आयोजित मोर्चात शेतकरी, शेतमजुरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता़ तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले़
शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस नापिकीसाठी तातडीने अनुदान द्यावे, शेतमालाला योग्य भाव तसेच पीककर्ज माफ करून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, निराधार व पेन्शनधारकांना दीड हजार रूपये महिना द्यावा, शेतमालाकरीता स्वामीनाथन् आयोग लागू करावा, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी घटकांतील ग्रामस्थांना त्वरित घरकूल योजनेचा लाभ द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी पांडुरंग ढोले यांच्या नेतृत्वात अमर शहीद भगतसिंग चौकातून तहसीलवर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चासाठी दुय्यम ठाणेदार प्रशांत कावरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़ मोर्चात जदसेचे विजय गोठाने, नरेश मालवे, शैलेश शिरभाते, विकास राऊत, सदाशिव कांबळे सहभागी झाले.