शेतकºयांनो, तुम्हीच एकत्र व्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:12 PM2017-09-10T23:12:04+5:302017-09-10T23:12:30+5:30
‘सरसकट कर्जमाफी’ हा शेतकºयांचा अधिकार आहे, त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या गोष्टी निवडणूक प्रचारात केल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुºहा : ‘सरसकट कर्जमाफी’ हा शेतकºयांचा अधिकार आहे, त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या गोष्टी निवडणूक प्रचारात केल्या होत्या. पण अद्यापपर्यंत असे काही झाले नाही. देशातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकार फक्त शेतकºयांना फसविण्याचे काम करीत आहे. यामुळे विखुरलेल्या शेतकºयांनो, तुम्ही एकत्र झाले तरच सरकार नरमेल, असे आवाहन किसान नेते शांताराम वाळूंज यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रात शेतकºयांच्या कर्जमाफीबाबत जनजागृती करणारी किसान सभेने काढलेली किसान संघर्ष यात्रा शनिवारी अमरावती जिल्ह्यात कौंडण्यपूर येथे दाखल झाली आणि जिल्ह्याच्यावतीने येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले.
यावेळी कुºहा येथील सुमेरसिंग नाहाटे सभागृहात जाहीर सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, ३४ हजार कोटींची कर्जमाफी घोषणा केली पण त्यात घातलेल्या जाचक अटीमुळे शेतकºयांसोबत त्याची पत्नी व कुटुंबाची ससेहोलपट होत आहे. योजनेला शिवाजी महाराजांचे नाव देऊन त्यांचा रयतेला त्रास देण्याचा प्रकार सद्य देशात सरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
यावेळी अशोक सोनारकर, डॉ.महेश कोपुलवार, लक्षण ढाकळे, शाहीर धम्म खडसे, विजय रोडगे, गंगाधर खेडकर यांच्यासह शेतकरी शेतकरी उपस्थित होते.
चांदूररेल्वेत आतशबाजी
महाराष्ट्र राज्य किसान संघर्ष समितीच्या किसान यात्रेचे चांदूररेल्वे येथे जुना मोटर स्टँड चौकात शेतकºयांनी स्वागत केले. यावेळी शेतकºयांनी आतषबाजी केली. स्वामिनाथन आयोग लागू करा, सरसकट कर्जमाफी द्या, असे फलक हाती घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. किसान संघर्ष यात्रेचे नेतृत्त्व अशोक सोनारकर, शांताराम वाळूज करीत आहेत. यावेळी त्यांनी सरकारच्या कर्जमाफीचा खरपूस समाचार घेतला.