चांदुरबाजारात सत्तारुढ नगरसेवकांचे पालिका प्रशासनाविरोधात उपोषण
By admin | Published: April 1, 2015 12:26 AM2015-04-01T00:26:07+5:302015-04-01T00:26:07+5:30
स्थानिक नगरपालिकेत प्रहारची सत्ता असून स्वत: शिक्षण व आरोग्य सभापती गोपाल तिरमारे ...
चांदूरबाजार : स्थानिक नगरपालिकेत प्रहारची सत्ता असून स्वत: शिक्षण व आरोग्य सभापती गोपाल तिरमारे तसेच त्यांच्या सोबतीला काँग्रेसचे नगरसेवक एजाजअली नगरपालिका कार्यालयात ठिय्या आंदोलनाला बसले. मात्र या आंदोलनाला उर्वरीत १५ नगरसेवकांनी विरोध दर्शविला.
स्थानिक नगरपालिकेत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यापैकी आरोग्य निरीक्षक राजेंद्र जाधव हे कर्तव्यदक्ष कर्मचारी मानल्या जातात. पालिकेत सफाई कर्मचारींची कमी असताना सुद्धा गावातील साफसफाईकडे विशेष लक्ष देणे हे आपले पहिले कर्तव्य समजून गेल्या २२ वर्षापासून पालिकेत आपली सेवा देत आहे. अश्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर आरोग्य सभापतीतर्फे कामचुकाराचे आरोप करून सर्वांसमक्ष अर्वाच्य भाषेत वारंवार अपमान केले जात असल्यानी आरोग्य निरीक्षक राजेंद्र जाधव यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवार सकाळी नगरपालिकेत सफाईच्या मुद्यावरून आरोग्य सभापती गोपाल तिरमारे व नगरसेवक एजाजअली यांनी आपल्या दालनात बोलावून अर्वाच्य भाषेत वापर करून अपमानित केले. तसेच या नगरसेवकांचा सफाईच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने नगरसेवक तिरमारे, एजाजअली यांनी आपल्या निवेदनात आत्महत्येचा इशारा दिला. यामुळे आरोग्य निरीक्षक राजेंद्र जाधव यांनी अचानक मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. यावर नगरपालिकेचे वातावरण तापले होते. यावर आरोग्य सभापती तिरमारे, नगरसेवक एजाज अली यांनी कोणतीच पूर्वसूचना न देता नगर पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलनास सुरुवात केली.
परंतु तिरमारे व एजाज अली यांनी ठिय्या आंदोलनाची माहिती पक्षाचे गटनेते, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच पोलीस स्टेशनला न दिल्याने या आंदोलनाला कोणताच प्रतिसाद मिळू शकला नाही. या आंदोलनाविरोधात पालिकेचे नगराध्यक्षासह १५ नगरसेवक एकवटले असून हे आंदोलन केवळ प्रसिद्धीकरिता होत असल्याचे सांगितले. नगरसेवक गोपाल तिरमारे यांची अचानक आंदोलनाची भूमिका संशयास्पद असल्याने आरोग्य निरीक्षक जाधव यावरील आरोप करून दबाव टाकून काम करून घेण्याची तिरमारे यांची जुनी सवय असल्याचे उपस्थित नगरसेवकांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)