बापाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:04+5:302021-01-14T04:12:04+5:30

अमरावती : बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीचे कपडे काढून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना २८ मे २०१९ पूर्वी राजापेठ ...

Father attempts to sexually abuse minor daughter | बापाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न

बापाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न

Next

अमरावती : बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीचे कपडे काढून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना २८ मे २०१९ पूर्वी राजापेठ ठाणे हद्दीतील एका नगरात घडली. मुलीने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गैरवर्तन केल्याची माहिती पीडिताच्या आजीला व आत्याला माहिती असतानाही त्यांनी ही माहिती दडवून ठेवली. कुठेही वाच्यता करू नको, अशी धमकीसुद्धा दिल्यामुळे याप्रकरणी पीडितेची आजी व आत्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले, तर आरोपी पसार झाला आहे.

पोलीससूत्रानुसार, ४२ वर्षीय बापाने पोटचा गोळा असलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीशी लैंगिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मुलीने ही माहिती आईला दिल्यानंतर पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी वडील, पीडिताची आजी व आत्याविरुद्ध राजापेठ पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा भादंविचे कलम ३७६(२), (फ), आय, जे ३७६(अ, ब),२०२,५०६ ब, सहकलम ४,६,८,१२ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविला. पती- पत्नीचे पटत नसल्याने पत्नी माहेरी राहत होती. पती आपल्या आई व बहिणीसोबत राहत होता. घटनेच्या दिवशी मुलगी आजीकडे आली असता, आरोपी वडिलाने तिचे कपडे काढले त्यानंतर लैंगिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आधी मुलीने ही माहिती कुणालाही सांगितले नाही. मात्र, त्यानंतर घरी गेल्यानंतर ही माहिती तिने तिच्या आईला सांगितल्यानंतर घटनेचे बिंग फुटले. मात्र, पीडितेच्या ६५ वर्षीय आजीला व ३५ वर्षीय आत्याला या घटनेची कल्पना होती. मात्र, त्यांनी ही माहिती पोलिसांना न देता दडवून ठेवली. पीडिताला धमकीसुद्धा दिली. त्यामुळे मुलीने आधी कुणाकडे याची वाच्यता केली नाही. त्यानंतर तिने आईला ही माहिती दिली. पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहे.

Web Title: Father attempts to sexually abuse minor daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.