चार महिन्याच्या मुलाला घेऊन बाप झाला पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:55+5:302021-07-04T04:09:55+5:30

अमरावती : दारूचे व्यसन असलेला बाप चार महिन्याच्या मुलाला घेऊन पसार झाला. मुलाला काही तर होणार नाही ना? या ...

The father passed away with a four-month-old child | चार महिन्याच्या मुलाला घेऊन बाप झाला पसार

चार महिन्याच्या मुलाला घेऊन बाप झाला पसार

Next

अमरावती : दारूचे व्यसन असलेला बाप चार महिन्याच्या मुलाला घेऊन पसार झाला. मुलाला काही तर होणार नाही ना? या भीतीने आईने गाडगेनगर पोलिसात धाव घेतली. ही घटना गाडगेनगर ठाण्यांतर्गत रहाटगाव येथे शनिवारी दुपारी घडली. गाडगेनगर पोलीस सदर वडिलाचा व मुलाचा शोध घेत आहे.

मूळचा जळगाव जिल्ह्यातील ३० वर्षीय युवक हा २५ वर्षीय पत्नीसह रहाटगाव येथे राहतो. येथील ड्रीमलॅन्डमध्ये तो मजुरीचे काम करतो. त्यांना चार महिन्याचा मुलगाही आहे. मात्र, घरगुती वादातून तो अचानक मुलासह घरून निघून गेला. पत्नीने त्याचा परिसरात शोध घेतला असता, तो मिळून आला नाही. त्यामुळे आपल्या मुलाला काही तर होणार नाही ना? या भीतीने मुलाच्या आईने गाडगेनगर पोलिसात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले सदर मुलाचा शोध घेत आहे. वृत्त लिहिस्तोवर पतीविरुद्ध पत्नीने कुठलीही तक्रार नोंदविली नव्हती.

Web Title: The father passed away with a four-month-old child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.