सून व मुलांच्या त्रासाने अमरावती जिल्ह्यात पित्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:07 PM2018-02-07T13:07:41+5:302018-02-07T13:09:02+5:30

संपत्तीचा वाद आणि त्यातूनच मुले आणि सुनेच्या त्रासाला कंटाळून पित्याने आत्महत्या केल्याची घटना मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे उघडकीस आली.

The father's suicide in Amravati district due to the suffering of children and children | सून व मुलांच्या त्रासाने अमरावती जिल्ह्यात पित्याची आत्महत्या

सून व मुलांच्या त्रासाने अमरावती जिल्ह्यात पित्याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देमोर्शी तालुक्यातील घटना चिठ्ठीतून झाला खुलासातिघांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संपत्तीचा वाद आणि त्यातूनच मुले आणि सुनेच्या त्रासाला कंटाळून पित्याने आत्महत्या केल्याची घटना मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे उघडकीस आली. विठ्ठल जोतीराम पांडे (७६) असे मृताचे नाव आहे. याचा खुलासा मृताच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीतून झाला. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी दोन मुले व सून अशा तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, १६ जानेवारीपूर्वी विठ्ठल पांडे यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला होता. तपासात पोलिसांना विठ्ठल पांडेंची दोन मुले व सून त्यांना त्रास देत असल्याची माहिती मिळाली.अन्य दोन मुले व सून यांच्याकडून घर व संपत्तीच्या वादातून वडिलांना (विठ्ठल) त्रास दिला जात होता. ते दररोज भांडण व शिवीगाळ करीत होते. या रोजच्या छळाला कंटाळून त्यांनी विषारी औषधी प्राषन करून आत्महत्या केली, अशी तक्रार मृताचा अन्य मुलगा रघुनाथ व त्याची पत्नी सविता यांनी दिली.
याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी उमेश (४४), दिनेश (३८) व सून कल्पना दिनेश पांडे यांच्यावर भांदवि कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. तपास शिरखेडचे ठाणेदार नितीन चव्हाण करीत आहेत.

Web Title: The father's suicide in Amravati district due to the suffering of children and children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू