एफडीएच्या अधिकाऱ्यांना गुटखा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2017 12:09 AM2017-06-20T00:09:04+5:302017-06-20T00:09:04+5:30

राज्यात गुटखाबंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखाबंदी होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी युवासेनचे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ....

FDA officials meet Gutkha | एफडीएच्या अधिकाऱ्यांना गुटखा भेट

एफडीएच्या अधिकाऱ्यांना गुटखा भेट

Next

लक्षवेधी : युवासेनेचे एफडीएच्या कार्यालयासमोर आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात गुटखाबंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखाबंदी होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी युवासेनचे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी येथील अन्न व प्रशासन विभागाच्या कार्यलयासमोरच गुटखाविक्री करण्यासाठी दुकान मांडून गुटखा विकला, असे अनोखे आंदोलन करून येथील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना गुटखा भेट म्हणून देण्यात आला. यामुळे एफडीएच्या कार्यालयासमोर काहीवेळ तणाव सदृश परिस्थिती झाली होती.
शहरात कोट्यवधी रूपयांचा गुटखा, सुगंधी तंबाखू व गुटखाजन्य पदार्थांची विक्री होत आहे. यामुळे तरूणवर्ग व्यसाधीन होत आहे. हा अवैध गुटखा हा अधिकाऱ्यांच्या आर्शिवादामुळे विक्री होत असल्याने गुटखा विक्रेत्यांचे जाळे सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे हा प्रकार त्वरित थांबवावा व कारवाई करावी याकरिता गुटखांच्या पुड्यांचा हार करून तो येथील अन्न व प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी यांना भेट म्हणून देण्यात आला.
सदर आंदोलन हे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष पराग गुडधे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनामध्ये यावेळी शहरप्रमुख प्रवीण दिधाते, सचचिटणीस स्वराज ठाकरे, वैभव मोहोकार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सदर आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत होते. पण या आंदोलनाची आता सुुरूवात झाली असून सदर आंदोलन एकाचवेळी जिल्हाभर छेडण्यात आलेले आहे. यानंतर जर अवैध गुटखाविक्री बंद झाली नाही तर आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते.

Web Title: FDA officials meet Gutkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.