जंगलात पाणवठ्यांवर विष प्रयोगाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:12 PM2019-03-04T23:12:32+5:302019-03-04T23:12:52+5:30

यंदा पावसाळा अत्यल्प झाल्याने मार्च महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. वनक्षेत्रात पाणीटंचाईचे अधिकच गडद संकट उभे ठाकले आहे. व्याघ्र प्रकल्प अथवा वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठे आटल्याने कृत्रिम पाणवठे तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

Fear of poisoning in forests | जंगलात पाणवठ्यांवर विष प्रयोगाची भीती

जंगलात पाणवठ्यांवर विष प्रयोगाची भीती

Next
ठळक मुद्देवन्यजीव विभागाकडून अलर्ट : व्याघ्र प्रकल्प, वनकर्मचाऱ्यांना टिप्स

गणेश वासनिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदा पावसाळा अत्यल्प झाल्याने मार्च महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. वनक्षेत्रात पाणीटंचाईचे अधिकच गडद संकट उभे ठाकले आहे. व्याघ्र प्रकल्प अथवा वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठे आटल्याने कृत्रिम पाणवठे तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. नेमकी हीच बाब हेरून शिकाऱ्यांकडून विदर्भातील पाणवठ्यांवर विषप्रयोग करून वाघ, बिबट्यांची शिकार होण्याची भीती वन्यजीव विभागाने व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) यांनी अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्यवनसंरक्षकांनी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी वनविभाग, वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षकांना पत्र पाठवून पाणवठ्यांवर वाघ, बिबट आदी वन्यजीवांचे विषप्रयोगाने शिकार होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठे हे शिकाºयाचे लक्ष्य असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
विदर्भात सहा व्याघ्र प्रकल्प, ९ अभयारण्य आणि २० राखीव वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठ्यात पाणी आटत असल्याची बाब वन्यजीव विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाने कृत्रिम पाणवठे तयार करण्याची लगबग चालविली आहे. उन्हाळ्यात वाघ, बिबट आदी वन्यजीव ठरावीक कृत्रिम पाणवठ्यांवर तृष्णा भागविण्यास येत असल्याचे शिकाऱ्यांना प्रामुख्याने माहिती असते. उन्हाळ्यात सहजतेने पाणवठ्यांत विष कालवून वाघांची शिकार झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. परिणामी पाणवठ्यांमध्ये विष कालवून अथवा युरियामिश्रित पाणी प्यायल्यास वन्यजीवांची शिकार होण्याची भीती वन्यजीव विभागाने वर्तविली आहे.

कृत्रिम पाणवठ्यांची अशी घ्यावी काळजी
वनक्षेत्रात नैसर्गिक किंवा कृत्रिम पाणवठ्याची पशू वैद्यकीय अधिकाºयांकडून दैनंदिन तपासणी करून घ्यावे लागेल. युरिया मिश्रित पदार्थ, विषप्रयोगाबाबत वनाधिकाºयांनी सजग असावे, पाणवठ्यांबाबत वनकर्मचाºयांना तांत्रिक ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण द्यावे, पाणवठ्यात तपासणीसाठी पीएच पेपरचा वापर करावा, पाणवठ्याची दररोज देखरेख आणि पाणी तपासणी करावी, व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालकांनी आकस्मिक भेट देऊन पाणवठे तपासणी करावे, अशा सूचना एपीसीसीएफ वन्यजीव यांनी दिल्या आहेत.

ट्रॅप कॅमेरे बसवा
व्याघ्र प्रकल्प अथवा वनक्षेत्रातील प्रमुख पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे बसविण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणासह शिकाºयांवर यामाध्यमातून पाळत ठेवण्याचे निर्देश वाईल्ड लाईफ एपीसीसीएफ यांनी दिले आहे. रात्री-अपरात्री वनक्षेत्रात आकस्मिक भेट देत वरिष्ठ वनाधिकाºयांना पानवठे तपासणीच्या सूचना आहेत.

यंदा वनक्षेत्रात पाणीटंचाई जाणवत आहे. कृत्रिम पाणवठे तयार करण्याला वेग आला आहे. या पाणवठ्यांवर वाघ, बिबटांची शिकार होण्याच्या घटनेपासून सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहे.
- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव

Web Title: Fear of poisoning in forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.