विद्यापीठात बहि:शाल विद्यार्थ्यांची स्वाक्षरीसाठी फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:20 PM2018-07-24T22:20:56+5:302018-07-24T22:21:22+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बहि:शाल विद्यार्थ्यांची परीक्षा अर्जावर स्वाक्षरीसाठी फरफट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विभागप्रमुखांकडे पाच ते सहा येरझारा मारल्यानंतही परीक्षा अर्जावर स्वाक्षरी मिळत नाही. त्यामुळे बहि:शाल विद्यार्थ्यांनी व्यथा कुणाकडे मांडावी, असा सवाल उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बहि:शाल विद्यार्थ्यांची परीक्षा अर्जावर स्वाक्षरीसाठी फरफट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विभागप्रमुखांकडे पाच ते सहा येरझारा मारल्यानंतही परीक्षा अर्जावर स्वाक्षरी मिळत नाही. त्यामुळे बहि:शाल विद्यार्थ्यांनी व्यथा कुणाकडे मांडावी, असा सवाल उपस्थित होत आहे.
नागपूर येथील केंद्रीय विद्यालयाचे सहायक प्राध्यापक तुषार नागदिवे हे सोमवारी अमरावती विद्यापीठात एम.ए. राज्यशास्त्र भाग- २ चा बहि:शाल परीक्षेचा अर्ज सादर करण्यासाठी आले होते. बहि:शाल परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जावर प्राधिकृत अधिकाºयांची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे. स्वाक्षरी नसल्यास बहि:शाल विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज नामंजूर होतो. तुषार नागदिवे हे सोमवारी विद्यापीठात पाच ते सहा विभागप्रमुखांकडे गेले. काहींनी चक्क नकार दिला, तर काहींनी दुसºया विभागाकडे बोट दाखविले. अखेर त्यांनी विद्यापीठ जनसंपर्क कार्यालय गाठले. त्यांनी मार्गदर्शन करण्याची विनंती जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर यांच्याकडे केली. बहि:शाल विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जावर स्वाक्षरीसाठी प्राधिकृत अधिकाºयांची यादी जनसंपर्क कार्यालयाच्या दर्शनी भागात असली तरी यापैकी बहुतांश मोबाईल उचलत नव्हते, असा अनुभव तुषार नागदिवे यांनी मांडला. विद्यापीठाचे वर्ग- १ किंवा वर्ग- २ च्या अधिकाºयांना स्वाक्षरीचे अधिकार प्रदान केल्यास विद्यार्थ्यांची पायपीट थांबेल, असा सूर या प्रकरणात उमटू लागला आहे.
परीक्षा अर्जावर यांची हवी स्वाक्षरी
विद्यापीठात बहि:शाल विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करताना प्राधिकृत अधिकाºयांची स्वाक्षरी अनिवार्य केली आहे. विद्यापीठ कायद्यानुसार सिनेट सभेने स्वाक्षरीसाठी काही पदे निश्चित केली आहे. यात न्यायाधीश, प्राचार्य, अधिसभा सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य, महाविद्यालये अथवा विद्यापीठ विभागाचे शिक्षकांचा समावेश आहे.
बहि:शाल विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीसाठी विद्यापीठात जुन्या अधिसूचेनुसार कार्यवाही सुरू आहे. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी असून, लवकरच त्याविषयी तोडगा काढून विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक न्याय दिला जाईल.
- राजेश जयपूरकर
प्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ.