वित्त समितीत निधी खर्चासाठी घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 09:52 PM2018-03-27T21:52:37+5:302018-03-27T21:52:37+5:30
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाला सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील विकासकामांचा निधी खर्च करण्यास मार्च एंडिंगची 'डेडलाईन' आहे. त्यामुळे शासनाकडून वित्तीय वर्षातील 'ब' गटासाठी ५ कोटी ६० लाख ८० हजारांचा निधी मिळाला. त्यापैकी ५६ लाख रूपयांचा निधी खर्च झाला. उर्वरित निधी मार्च एडिंगपर्यंत खर्च होणे अपेक्षित आहे.
अमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागाला सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील विकासकामांचा निधी खर्च करण्यास मार्च एंडिंगची 'डेडलाईन' आहे. त्यामुळे शासनाकडून वित्तीय वर्षातील 'ब' गटासाठी ५ कोटी ६० लाख ८० हजारांचा निधी मिळाला. त्यापैकी ५६ लाख रूपयांचा निधी खर्च झाला. उर्वरित निधी मार्च एडिंगपर्यंत खर्च होणे अपेक्षित आहे.
मंगळवारी पार पडलेल्या वित्त समितीच्या सभेत सभापती बळवंत वानखडे यांनी विकासकामांचा निधी शासनाकडे परत न जाता तो मुदतीत खर्च करण्याची सूचना सर्वखातेप्रमुखांना दिली. विविध खात्यांचा जमा खर्चाचा आढावा सभापती व समिती सदस्यांनी घेतला. सन २०१६-१७ या वर्षात विविध विभागाला निधी मिळाला आहे. विविध विभागात शिल्लक निधी खर्च करण्याबाबत निर्देशित केले आहे. यावेळी सदस्य राजेंद्र बहूरूपी, बाळासाहेब इंगळे, कविता काळे, सरला मावस्कर, कॅफो रवींद्र येवले, दत्तात्रय फिसके, राजेश नाकील,माया वानखडे, विजय रहाटे,गजानन कोरडे, प्रशांत नेवारे, अजित रामेकर, एस.डी अंबुलकर, प्रकाश गोतमारे, सुनील वानखडे आदी उपस्थित होते.
५ एप्रिलपूर्वी कामे आटपा, कॅफोंच्या सूचना
मार्च एंडिंगचे क्लोजिंग ३१ला केले जाते. झेडपीत मार्च एंडिंग हा एप्रिल अखेर पर्यत चालतो. परंतु आता ५ एप्रिलनंतर कुठलेही चालू आर्थिक वर्षातील देयके अदा केले जाणार नाही. त्यामुळे मुदतीतच कामे करू न देयके सादर करावे अशा सूचना कॅफो रवींद्र येवले यांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत.