वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार

By admin | Published: June 28, 2017 01:48 AM2017-06-28T01:48:43+5:302017-06-28T01:48:43+5:30

गेल्या १५ दिवसांपासून येथील एमआयडीसी रिंगरोड परिसरात दिसणाऱ्या मादी बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.

A female leopard killed in the shock of the vehicle | वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार

वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गेल्या १५ दिवसांपासून येथील एमआयडीसी रिंगरोड परिसरात दिसणाऱ्या मादी बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास वडद बीटअंतर्गत एमआयडीसी पेट्रोलपंप परिसरात ही घटना घडली.
तत्पूर्वी या मादी बिबट्याने रानडुक्कर व कुत्र्याची शिकार केल्याचेही निदर्शनास आले. मृत मादी बिबट्याचे वय अंदाजे ७ ते ८ वर्षे आहे. घटनास्थळी रानडुक्कर चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत आढळला. मादी बिबट्याने रानडुकराची शिकार केल्यानंतर रिंगरोड ओलांडताना हा अपघात घडल्याचा अंदाज आहे.

Web Title: A female leopard killed in the shock of the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.