महिला कर्मचारी चालवणार ‘ड्रोन’; आरोपींच्या शोधासाठी होणार उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 12:18 AM2024-06-26T00:18:45+5:302024-06-26T00:20:19+5:30

या ड्रोनला ऑपरेट करण्याकरीता दोन महीला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सध्या सुरू असल्याचे पोलिस आयुक्त यांनी लोकमतला सांगितले.

female staff will operate drone and it will be used to find the accused | महिला कर्मचारी चालवणार ‘ड्रोन’; आरोपींच्या शोधासाठी होणार उपयोग

महिला कर्मचारी चालवणार ‘ड्रोन’; आरोपींच्या शोधासाठी होणार उपयोग

मनीष तसरे, अमरावती: शहर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी आधूनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिक भर दिला.'ड्रोनचा कॅमेरा' हे तंत्रज्ञान वापरण्याचा उद्देश जमाव,मोर्चे,शहरातील राजकीय सभा,निवडणूकीचे निकाला दरम्यान होणारा जमाव तसेच शहरातील वाहतुक जाम या गतिशीलतेवर लक्ष ठेवणे आहे.पोलिस घटनास्थळी लगेच पोहोचू शकत नसले तरी ड्रोनचा कॅमेरा त्यादरम्यान एरियल शॉट्स घेऊन जमावा बद्ल तात्काळ माहीती घेऊन त्यावर योग्य सूचना देऊन लगेच उपाययोजना करता येईल,तसेच गुन्हातील आरोपींचा शोध घेण्याकरीता सूध्दा या ड्रोन चा उपयोग पोलिस विभागाला होईल.या ड्रोनला ऑपरेट करण्याकरीता दोन महीला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सध्या सुरू असल्याचे पोलिस आयुक्त यांनी लोकमत ला सांगितले.

शहरातील गुन्ह्यांचा तपास अत्याधुनिक पद्धतीने करण्यासाठी पोलीस आयुक्तालय अमरावती शहर यांचेकडून अत्याधुनिक साहित्याची खरेदी नुकतीच करण्यात आली असून सदरच्या साहित्याचे वापराबाबत प्रशिक्षण देण्याकरिता कंपनीचे प्रशिक्षक व तज्ञ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण देणे सुरू आहे. या मध्ये प्रथम गुन्हा घडलेल्या ठिकाणी घटनास्थळाचा पंचनामा करण्याकरिता थ्री डी मॅपींग मशीन चे प्रशिक्षण पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले आहे तसेच पोलीस आयुक्तालयात देखरेख ठेवण्याकरिता आधुनिक ड्रोण कॅमेरा घेण्यात आला असून त्याबाबत चे प्रशिक्षण पोलीस आयुक्तालय हे मैदानावर कंपनीचे तज्ञाकडून देणे सुरू आहे

इन्फ्रा रेड कॅमेरा

ड्रोण कॅमेरा चे वैशिष्ट्य म्हणजे हा कॅमेरा १००० फूट पर्यन्त वर जावून ४ किलोमिटर चे परिघात फिरू शकतो. म्हणजेच एका ठिकाणी बसून ड्रोण कॅमेरा द्वारे शहरातील महत्त्वाचे मोर्चे, सभा, धार्मिक मिरवणुका यांचेवर लक्ष ठेवणे सोपे होईल. तसेच ड्रोण कॅमेरा द्वारे उच्च गूणवत्तेचे फोटो व व्हीडीओ घेता येत असल्याने शहरातील मिरवणुका, मोर्चे यांचे दरम्यान गैरकृत्य करण्यावर पाळत ठेवून गैरकृत्य करणाऱ्यांना तत्काळ ओळखून ताब्यात घेणे सोपे होईल. इतकेच नाहीतर सदर ड्रोण कॅमेरा मध्ये इन्फ्रा रेड कॅमेरा असून रात्री दरम्यान अंधारात लावलेल्या गुन्हेगारांना शोधणे सोपे होईल. जंगल गस्ती दरम्यान आरोपी शोधा साठी याचा वापर करता येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना ड्रोण कॅमेरा चे थेट प्रक्षेपण लॅपटॉप व मोबाईल वरवर सुध्दा दाखवता येईल. नूकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणी केंद्रावर जवळ होणाऱ्या गर्दीवर ड्रोन कॅमेरा ची नजर होती.या दरम्यान शहरात कुढल्या ठिकाणी गर्दी होत आहे याचे निरीक्षण करण्यात येत होते.

कोड

शहरातील गुन्ह्यांचा तपास तातडीने व आधूनिक तंत्रज्ञाना वापर व्हावा या करीता पोलीस आयुक्तालय शहर यांचेकडून अत्याधुनिक साहित्याची खरेदी नुकतीच करण्यात आली.शहरात होणारे मोर्चे, सभा, धार्मिक,राजकीय मिरवणुका यांचेवर लक्ष ठेवण्याकरीता आधुनिक ड्रोन उपयोग हाईल तसेच ड्रोण कॅमेरा मध्ये इन्फ्रा रेड कॅमेरा असून रात्री दरम्यान अंधारात लावलेल्या गुन्हेगारांना शोधणे सोपे होईल. जंगल गस्ती दरम्यान आरोपी शोध घेण्यासाठी याचा वापर होईल --नवीनचंद्र रेड्डी,पोलिस आयुक्त अमरावती शहर

Web Title: female staff will operate drone and it will be used to find the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस