दुष्काळमुक्तीसाठी जमिनी सुपीक करा
By admin | Published: January 8, 2015 10:47 PM2015-01-08T22:47:57+5:302015-01-08T22:47:57+5:30
रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत असल्याने शेतीची पोत घसरत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. यावर मात करून उत्पादकता वाढविण्यासाठी
अमरावती : रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत असल्याने शेतीची पोत घसरत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. यावर मात करून उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीची सुपिकता वाढविणे गरजेचे आहे, असे किसान स्वराज्य आंदोलक प्रमोद तऱ्हेकर यांनी येथील एका हॉटेलमध्ये पत्रपरिषदेत सांगितले.
धामणगाव मतदारसंघातील शंभर गावांत ग्राम स्वराज्य प्रकल्प प्रमोद तऱ्हेकर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणार आहे. याचा शुभारंभ नांदगाव खंडेश्वर येथील गजानन महाराज मंदिरात १२ जानेवारी रोजी होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून देहरादूनच्या कृषितज्ञ वंदना शिवा राहणार आहेत.
ग्रामीण भागातील शेती अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ग्राम स्वराज्य प्रकल्पांतर्गत शेतकरी, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रथम चरणात १०० गावांतील १५० शेतकरी प्रत्यक्ष शेतावर विविध प्रयोग करतील व प्रयोगाला येणारा खर्च किसान स्वराज्य आंदोलन देणार आहे. तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी २२ महिला गटांना ग्रिन हाऊस तंत्रज्ञानासह ग्रिन हाऊस सेंद्रीय भाजीपाला व औषधी या अर्थक्षम व रोजगारक्षम बनविण्यासाठी येणारा खर्च महिला गटांना देऊन त्यांना शेती विज्ञानाचे प्रशिक्षण व त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आंदोलक पुढाकार घेणार आहेत. (प्रतिनिधी)