खताच्या दरवाढीने शेतकरी हतबल

By admin | Published: May 27, 2014 11:21 PM2014-05-27T23:21:45+5:302014-05-27T23:21:45+5:30

सध्या ग्रामीण भागात शेतकर्‍यांकडून पावसाळ्याच्या मुहूर्तावर उन्हाळी व खरीप हंगामात पिकांना डोस देण्यासाठी रासायनिक खतांची खरेदी सुरू आहे. त्यामुळे रासायनिक खतांची मागणी वाढलेली आहे.

Fertilizer increases farmers' cultivation | खताच्या दरवाढीने शेतकरी हतबल

खताच्या दरवाढीने शेतकरी हतबल

Next

अमरावती : सध्या ग्रामीण भागात शेतकर्‍यांकडून पावसाळ्याच्या मुहूर्तावर उन्हाळी व खरीप हंगामात पिकांना डोस देण्यासाठी रासायनिक खतांची खरेदी सुरू आहे. त्यामुळे रासायनिक खतांची मागणी वाढलेली आहे. मागील चार वर्षात खतांच्या किमतीत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे व उत्पादीत मालास आधारभूत किंमत मिळत नसल्याचे समोर येत असल्याने शेतकरी हतबल असल्याचे चित्र आहे.

वारेमाप खते वापरून पीक चांगले घ्यावे तर त्या पिकाला आधारभूत किंमत मिळेल याची खात्री नाही आणि खतेच नाही वापरावीत तर उत्पादनात कमालीची घट यामुळे शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. देशात हरितक्रांती करण्याच्या उद्देशाने रासायनिक खतांचा वापर सुरू झाला परिणामी अतिरिक्त रासायनिक खताच्या वापराने जमिनीचा पोत घसरला. प्रत्येक वर्षी उत्पादनात वाढ होण्याच्या उद्देशाने रासायनिक खतांचा अधिक डोस देण्याकडे शेतकर्‍यांचा कल राहिला. मात्र प्रत्येक वर्षी होणार्‍या अतिरिक्त खताच्या मापाने जमिनी खराब झाल्या. खते वाढवूनही पिकांचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत मिळेनासे झाले यामुळे खताचा वापर पुन्हा वाढला. खताचा वापर वाढू लागल्याने कंपन्यांनी किमतीही वाढविल्या. आता या वाढीव किमतीमुळे व उत्पादनात दिवसेंदिवस होणार्‍या घटीमुळे शेती व्यवसायच तोट्यात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. २0१0 च्या तुलनेत रासायनिक खतांच्या किमतीत अडीच पटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे पण या खतांच्या दरवाढीचा विचार करता उत्पादीत पिकांच्या किमतीत वाढ झाली नाही. त्यातच खत विक्रेते या खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून वाढ रक्कम उचलतात. तो भाग वेगळाच त्यात काही न खरपणारी व अधिक कमीशन असणारी खते या रासायनिक खतांच्या बरोबर ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रमाणही वाढले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fertilizer increases farmers' cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.