आठ कृषी सेवा केंद्रांचे खत परवाने निलंबित; खताऐवजी मातीची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 11:19 AM2024-08-29T11:19:38+5:302024-08-29T11:20:07+5:30

बोगस खतविक्री अंगलट : एसएओंची कारवाई

Fertilizer licenses of eight agricultural service centers suspended; Selling soil instead of fertilizer | आठ कृषी सेवा केंद्रांचे खत परवाने निलंबित; खताऐवजी मातीची विक्री

Fertilizer licenses of eight agricultural service centers suspended; Selling soil instead of fertilizer

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
रासायनिक खतविक्रीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी आठ कृषी केंद्रांचे खत परवाने वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी राहुल सातपुते यांनी बुधवारी केली, यापूर्वी मुख्य वितरकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे, तर पाच कृषी केंद्र चालकांना ताकीद देण्यात आली आहे.


जिल्ह्यात रासायनिक खतांऐवजी ५० लाखांची माती विकण्याचा भंडाफोड कृषी विभागाने केला होता. संबंधित रामा फर्टिकेम खत कंपनीकडे आयएफएमएस प्रणालीवर आयडी क्रमांक नसतानासुद्धा मंदार अॅग्रो सर्व्हिसेस या मुख्य वितरकाद्वारा सहा तालुक्यांतील १२ किरकोळ विक्रेत्यांना खतांची विक्री करण्यात आली. त्यामुळे एसएओ राहुल सातपुते यांनी या विक्रेत्याचा खत परवाना यापूर्वी कायमस्वरूपी रद्द केला आहे. 


या खताची पॉस मशीनशिवाय विक्री करणाऱ्या १२ कृषी केंद्रांना नोटीस बजावण्यात आली होती. सुनावणीदरम्यान रामा फर्टिकेम या कंपनीचे खत 'ओ' फार्म परवान्यात समाविष्ट नाही व या खताची विक्री संबंधित कृषी केंद्रातून पॉस मशीनशिवाय झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने खताची रक्कम पाच केंद्र चालकांनी परत केली. त्यामुळे या केंद्रांना ताकीद देण्यात आली, तर अन्य आठ केंद्रांचे परवाने वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहेत.

काय आहे खताऐवजी माती विक्रीचे प्रकरण? 
पुणे येथील रामा फर्टिकम या खत कंपनीद्वारा जिल्ह्यात किमान ५० लाख रुपये किमतीचे डीएपी व एनपीकेऐवजी माती विक्री करण्यात आली. कृषी उपसंचालक उदय आगरकर व जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी घेतलेले खतांचे नमुने अप्रमाणित आल्यानंतर या कंपनीविरोधात शहर कोतवालीत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.


या केंद्रांचे परवाने निलंबित 
तिवसा तालुक्यात नीलेश कृषी केंद्र (मारडा), भामकर कृषी केंद्र (शिवणगाव), गणेश कृषी केंद्र (तिवसा), सावरकर कृषी केंद्र (तिवसा), याशिवाय खंडेश्वर कृषी केंद्र (नांदगाव खं), शुभम कृषी केंद्र (मंगरूळ च.), अमोल कृषी केंद्र (रिद्धपूर) व राऊत कृषी केंद्र (चांदूर रेल्वे) या केंद्रांचा खत विक्री परवाना १२ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला.

Web Title: Fertilizer licenses of eight agricultural service centers suspended; Selling soil instead of fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.