शेतकºयांनी घरीच तयार केले खत, पेरणी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 11:53 PM2017-08-09T23:53:48+5:302017-08-09T23:54:25+5:30
शेतकºयांची परिस्थिती बिकट असतानाही जगण्याची व नाविण्याची उमेद कायम असल्याचे ....
नितीन टाले।
लोकमत न्यूज नेटवर्क
कावली वसाड : शेतकºयांची परिस्थिती बिकट असतानाही जगण्याची व नाविण्याची उमेद कायम असल्याचे उदाहरण नजीकच्या गव्हानिपाणी येथील युवा शेतकरी प्रशांत हटवार यांनी आपल्या कृतीतून दिले आहे. प्रशांत यांनी आपल्या घरीच साहित्याची जुळवाजुळव करून खत व पेरणी यंत्राची निर्मिती केली आहे.
दिवसेंदिवस मजुराची संख्या कमी होत आहे. सोबतच मजुरीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्या जात आहे. त्यामुळे शेती ही परवडत नाही, अशी ओरड आहे. मजूर न मिळाल्यामुळे वेळेवर शेतीचे कामे होत नाही. वेळ आणि पैसा याची बचत व्हावी. म्हणून व शेतीचे कामही वेळेवर व्हावे, हा विचार मनात ठेवून आधुनिकतेची कास धरत पेरणी यंत्र तयार केल्याचे हटवार यांनी सांगितले. साधारण या पेरणी यंत्राला एक हजार रूपये खर्च आला आहे. घरचाच डवरा, एक टोपली, एक पोकळ पाईप आणि दोन नळ्या आणि टोपलं बसेल इतका पाईप त्यावर बसविल्या गेले. एक कॉक पण केला गेला कारण ते कमीजास्त खत देता यावे, यासाठी दोन्ही बाजूला खत पडेल अशी रचना केली आहे. साधारणत: एक दिवसाला चार ते पाच एकरातील पिकाला यामुळे खत देऊ शकतो, असे हटवार यांनी सांगितले. या विज्ञानवादी युगात शेतकरीही मागे नाही, हे गव्हानिपाणी येथील शेतकरी प्रशांत हटवार यांनी दाखवून दिले.