प्लॅस्टिक कारखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 06:00 AM2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:50+5:30

राज्यात प्लॅस्टिक बंदी असतानाही प्लॅस्टिक पॉलीथीन तयार करणाऱ्या कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापर्यंत कारवाई का केली नाही? परवानगी देताना तपासणी का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. कारवाईनंतर शुक्रवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले.

Fest on a plastic factory | प्लॅस्टिक कारखान्यावर धाड

प्लॅस्टिक कारखान्यावर धाड

googlenewsNext
ठळक मुद्देसाठा जप्त : महापलिकेच्या स्वच्छता विभागाची कारवाई

अमरावती : गोपालनगरातील महाराष्ट्र राज्य औद्यागिक वसाहतीत (एमआयडीसी) कोठारी गोडावून व डीके प्लास्टिकवर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने गुरुवारी रात्री धाड टाकून साडेतीन क्विंटल प्लॅस्टिकसाठा जप्त केला.
राज्यात प्लॅस्टिक बंदी असतानाही प्लॅस्टिक पॉलीथीन तयार करणाऱ्या कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापर्यंत कारवाई का केली नाही? परवानगी देताना तपासणी का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. कारवाईनंतर शुक्रवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. कारवाईत डिके गोडावूनमधून अंदाजे तीन क्विंटल प्लास्टिक पॉलीथीन जप्त करण्यात आली. कोठारी गोदामातून ४४ किलो प्लास्टिकसाठा जप्त केला. प्रत्येकी पाच हजार दंड आकारला. स्वच्छता विभागाचे अरुण तिजारे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक कुंदन हडाले, दिनेश निंधाने, विक्की जेध, प्राधिकृत अधिकारी गणेश अनासाने, सुधीर तिवारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी राजापेठ पोलिसांचीही मदत घेण्यात आली. गुरुवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निरीक्षक कारनकर यांनी पाहणी केली.
रात्रीचा खेळ चाले
५१ मायक्रॉनपेक्षा जास्त प्लास्टिक पॉलिथीन उत्पादनाची परवानगी सदर कारखानदारांनी संबंधित यंत्रणेकडून घेतली आहे. सदर उत्पादन दिवसा केल्या जाते. पण दोन्ही कारखान्यात रात्री २० ते ३० मायक्रॉनपर्यंत प्लॅस्टिक पॉलिथीन उत्पादित करून ते पहाटे ४ पूर्वी व्यापाऱ्यांकडे पाठविण्यात येत होते. त्यामुळे सदर ‘रात्रीच खेळ चाले’ असा प्रकार गेल्या सुरू होता. म्हणून कारवाई रात्री करण्यात आल्याची प्रतिक्रिया प्रधिकृत अधिकारी गणेश अनासाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Fest on a plastic factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.