ब्रह्मचारी महाराजांच्या महोत्सवात उसळला भक्तसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:00 PM2018-01-14T23:00:25+5:302018-01-14T23:01:52+5:30
अमरावती जिल्ह्यातील संत ब्रह्मचारी महाराजांच्या १४९ वा पुण्यतिथी महोत्सवनिमित्त रेवस्यात भाविकांचा जनसागर उसळला.
आॅनलाईन लोकमत
रेवसा : अमरावती जिल्ह्यातील संत ब्रह्मचारी महाराजांच्या १४९ वा पुण्यतिथी महोत्सवनिमित्त रेवस्यात भाविकांचा जनसागर उसळला. ४ जानेवारीपासून सुरू झालेल्या या पुण्यतिथी महोत्सवात पार पडलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांनी हजेरी लावली.
रेवसा येथील संत ब्रह्मचारी महाराजांच्या समाधीस्थळी प्रांगणात पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भजन, कीर्तन, होमहवन, रथयात्रा, ढोल-ताशा पथक, झाकी स्पर्धा, विदर्भ स्तरीय खंजेरी भजन स्पर्धा, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, व्यायामाचे प्रात्यक्षिके, गोपालाकाला, दहीहंडी, महाप्रसाद आदी कार्याक्रम पार पडले. गुरुवारी ११ रोजी गोपाला-गोपालाच्या गजरात जिल्ह्यातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या महाप्रसादासाठी गावकरी व कार्यकर्ते कष्ट घेतात. येथील महाप्रसाद नियोजनाचे जिल्ह्याभर कौतुक होते.
गावाला पंढरीचे स्वरुप
पुण्यतिथी महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान गावातील चौका चौकांत धार्मिक व सुंदर आशी दुश्य साकारण्यात आली आहेत. प्रत्येकाच्या दारी आकर्षक रांगोळी काढून ब्रह्मचारी महाराजांचे स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमामुळे रेवस्याला पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. रेवस्यातील विवाहित मुली ब्रह्मचारी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला आवर्जून हजेरी लावतात.