स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी इच्छुकांची ‘फिल्डींग‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:59+5:302021-09-02T04:26:59+5:30

जितेंद्र दखने अमरावती : सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा, नगरपंचायतीसह इतर निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अद्याप निवडणुकीची ...

'Fielding' of aspirants for local bodies | स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी इच्छुकांची ‘फिल्डींग‘

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी इच्छुकांची ‘फिल्डींग‘

Next

जितेंद्र दखने

अमरावती : सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा, नगरपंचायतीसह इतर निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर झाली नाही. तरी इच्छुकांकडून आतापासूनच फिल्डींग लावणे सुरू झाल्याचे दिसून आहे.

निवडणूक रणधुमाळीला अद्याप काही दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी आतापासूनच इच्छूकांनी गण व गटात जनसंपर्क वाढविणे सुरू केले आहे.एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर इच्छुकांचा प्रचार बरसण्यास सुरूवात झाली आहे. पक्षाची उमेदवारी मिळण्याबरोबरच अपक्षही लढविण्याची तयारी इच्छुकांनी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांत इच्छुकांची चांगलीच गर्दी होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या वातावरणामुळे राजकीय डावपेचही आखणे सुरू झाले आहेत. सभांचे फड, प्रचारसभांच्या प्रसंगी रंगतीलच पण पूर्वतयारी म्हणून इच्छुकांनी जोरदार मोचेर्बांधणी सुरू केली आहे. निवडणुकीची लढाई मैदानात लढली जाते. तितकीच तिची रणनीती राजकीय पक्षांच्या वॉररूमध्येदेखील तयार केली जाते. उमेदवारांच्या प्रचारासाठी होणाऱ्या नेत्यांच्या सभा, दौरे, स्टार प्रचारक, विरोधकांकडून होणारे हल्ले तत्काळ परतवून लावणे मतदार याद्यांपासून मीडिया ब्रिफिंगपर्यंत सबकुछ या वॉररूममध्ये त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियालाच हक्काचा प्रचार स्टार ठरवणार असल्याने राजकीय पक्ष, इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. त्याची रंगीत तालीम सुरू आहे. लवकरच या ट्रेलरचे चित्रपटात रूपांतर झालेले मतदारांना दिसणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांनी जोरदार मोचेर्बांधणी सुरू केली आहे.

बॉक्स

उमेदवारीसाठी लॉबिंग

स्थानिक पातळीवर बडे नेते आघाडी,युतीचा निर्णय घेतील पण पक्षाने आपल्याला तिकीट नाही दिले तर बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढण्याची खुणगाठ सर्वच पक्षांतील इच्छुकांनी केली आहे. त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी जळपास सुरू केली आहे. आपल्या पक्षाला जागा सुटणार की नाही याचबरोबर आपल्याला उमेदवारी मिळविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू झाले आहेत.

Web Title: 'Fielding' of aspirants for local bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.