वणी बेलखेड येथे भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 05:00 AM2021-12-26T05:00:00+5:302021-12-26T05:00:54+5:30
२५ डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास वणी बेलखेडा येथे आग लागली. दोन तास चाललेल्या या अग्नितांडवाने काही कळायच्या आत उग्ररुप धारण केले. या अग्निप्रलयात अरुण मानकर, मंगला काळे, अब्दुल सत्तार या शेतमजुरांची घरे भक्ष्यस्थानी सापडली. यामध्ये धान्यांसह सर्व संसारोपोयोगी साहित्यांची राख झाली. योगेश अलोणे व गजानन फुले या शेतकऱ्यांचे गोठे जळून खाक झाले. या आगीत शेतकरी योगेश अलोणे यांच्या दोन गाई भाजल्या, तर गजानन फुले यांचे ट्रॅक्टरसह सर्व शेती अवजार जळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बेलोरा,चांदूरबाजार : तालुक्यातील वणी (बेलखेड) येथे शनिवारी सकाळी भीषण आग लागली. यात तीन घरे, दोन जनावरांचे गोठ्यांसह दोन गाई व एक ट्रॅक्टर जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार सात ते आठ लाखांचे नुकसान झाला असून, तीन कुटुंब उघडल्यावर आली आहेत.
२५ डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास वणी बेलखेडा येथे आग लागली. दोन तास चाललेल्या या अग्नितांडवाने काही कळायच्या आत उग्ररुप धारण केले. या अग्निप्रलयात अरुण मानकर, मंगला काळे, अब्दुल सत्तार या शेतमजुरांची घरे भक्ष्यस्थानी सापडली. यामध्ये धान्यांसह सर्व संसारोपोयोगी साहित्यांची राख झाली. योगेश अलोणे व गजानन फुले या शेतकऱ्यांचे गोठे जळून खाक झाले.
या आगीत शेतकरी योगेश अलोणे यांच्या दोन गाई भाजल्या, तर गजानन फुले यांचे ट्रॅक्टरसह सर्व शेती अवजार जळाले. तसेच तीनही शेतमजुरांचा संसार उघड्यावर आला आहे. या शेतमजुरांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे.
सामूहिक प्रयत्नही पडले थिटे
आग लागल्याचे लक्षात येताच वणी ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सर्वांनी सामूहिकरीत्या आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. परंतु आगीचे रौद्ररूप पाहता प्रसंगावधान राखून प्रहारचे मंगेश देशमुख यांनी तातडीने चांदूरबाजार येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर आग आटोक्यात आली. महसूलच्या मंडल अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली.
आगीची माहिती मिळताच, महसूलच्या प्रतिनिधींनी घटनास्थळ गाठले. तीन कुटुंबांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. रविवार, २६ डिसेंबरला नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
- धीरज स्थुल, तहसीलदार, चांदूरबाजार